Latest Posts

माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार बसले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांची अनेक गंभीर समस्या घेऊन आज ०२ जुलै ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत.

अहेरी विधानसभा क्षेत्रातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे –
१) १ एप्रिल २०१० मध्ये अहेरी जिल्हा निर्मीतीचा निर्णय शासन दरबारी झालेला आहे. अहेरी जिल्हांतर्गत अप्पर जिल्हाधिकारी यांना जिल्हाधिकाऱ्यांचा अधिकार अहेरी, भामरागड, सिरोंचा, एटापल्ली या चार तालुक्याकरीता देण्यात यावे.
२) अहेरी नगरपंचायत हद्दीतील नियमबाह्य ले-आऊट मध्ये केलेल्या कामाचा निधी, ले-आऊट धारकांकडून वसुली करण्यात यावा व अहेरी-चेरपल्ली येथील रस्त्याच्या डांबरीकरणात नियमबाह्य झालेल्या कामाची चौकशी करुन संबंधित कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.
३) मौजा-अहेरी येथील सर्व्हे क्र. २०७ च्या जमिनीचे मालकी हक्कदारांच्या मय्यतीनंतर खोटे संमती दाखवुन पोट हिस्सा केलेल्या प्रकरणाची व सदर मृत व्यक्तीला जिवंत दाखवुन एनएपी-३४ करीता मागणी केलेल्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.
४) अहेरी नगरपंचायत हद्दीतील उपविभागीय अधिकारी साहेबांनी दिलेल्या अटी व शर्तीचे उल्लंघण करुन ले-आऊट धारकांनी केलेल्या अनधिकृत प्लॉट खरेदी केलेल्या प्रकरणाची सखोल चौकशी करुन आदेश रद्द करण्यात यावे.
५) ले-आऊट मध्ये केलेल्या कामांची शासकीय निधी ले-आऊट धारकांकडून वसुल करण्यात यावे.
६) प्रापर्टी कार्ड क्र. १४०९, सिट क्र. ०९ ची कायदेशीर चौकशी करुन कार्यवाही करण्यात यावी.
७) अहेरी नगरपंचायत हद्दीतील नियमबाह्यरित्या केलेले डांबरीकरण कामांची चौकशी करून कंत्राटदारावर कार्यवाही करण्यात यावी.
८) एन.जी. पठाण, उप-अधिक्षक भूमी अभिलेख, अहेरी यांच्या कार्यकाळात झालेले संपूर्ण फेरफार व संपूर्ण प्रॉपर्टी कार्ड तसेच गावठाण अहेरी, आलापल्ली, नागेपल्ली, वांगेपल्ली येथील एनएपी- ३४ च्या सर्व जमिनीचे चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी.
९) प्रापर्टी कार्ड क्र.१४०९ सिट क्र. ०९ मध्ये आदिवासी प्रापर्टी कार्ड गैर आदिवासी यांच्याशी खरेदी विक्री करण्यात आले असुन आदिवासी प्रापर्टी गैर आदिवासी खरेदी-विक्रीची चौकशी करुन कार्यवाही करण्यात यावी.
१०) अहेरी साजा क्र. ०१ मध्ये अतिक्रमण नोंदवहीत खोडतोड व हेतुपरस्पर चढविण्यात आलेले नावांची सखोल चौकशी करुन तसेच उप अधिक्षत भूमी अभिलेख अहेरी येथील अतिक्रमण नोंदवहीची संपूर्ण चौकशी करुन दोषर्षीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.
११) उप अधिक्षक कार्यालय अहेरी येथे जुने प्रापर्टी कार्ड ऑनलाईन करण्यात आले असुन, त्यांचे जुने प्रापर्टी कार्ड नुसार ऑनलाईन प्रापर्टीकार्ड करण्यात आले नाही याची चौकशी करण्यात यावी.
१२) अहेरी गावठाण येथील सन २०२१-२२ मध्ये सर्व नकाशात ग्रामपंचायत रस्ते म्हणून ७/१२ मध्ये नोंद असलेल्या सन १९७४-७५ मध्ये झालेल्या सर्वेनुसार गावठाण नकाशात ते रस्ते नसल्याचे दिसून येत आहे. सन १९७४-७५ मध्ये झालेले सर्वे मध्ये रस्ते गायब असल्याची चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करण्यात यावी.
१३) दुय्यम निबंधक कार्यालय अहेरी यांच्या कार्यकाळात झालेल्या खरेदी-विक्री प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी.
१४) वांगेपल्ली व चिचगुडी ग्रामपंचायत हद्दीतील ले-आऊट उपविभागीय अधिकारी यांचे आदेशानुसार विक्री न करता परस्पर संपूर्ण प्लॉट विक्री करण्यात आले असुन, यांच्या आदेशाचे पालन न करता ज्यांनी ज्यांनी विक्री केले. त्या प्लॉटची चौकशी करुन आदेश रद्द करा.

अशा विविध मागण्यांना घेऊन अजय कंकडालवार यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन काय निर्णय घेते याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

यावेळी राष्ट्रीय कॉग्रेस पार्टी आदिवासी आघाडी जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी, राष्ट्रीय कॉग्रेस पार्टी महिला जिल्हा अध्यक्ष कविता माहुरकर, उबाटा शिवसेना गडचिरोली जिल्हा अध्यक्ष वासुदेव किसन शेडमाके, अजय नैताम माजी जि.प. सदस्य गडचिरोली, राजा दुर्गे ग्रा.प. सदस्य महागाव, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक न.प. अहेरी, हसन गिलानी माजी जिल्हा अध्यक्ष कॉग्रेस पार्टी गडचिरोली, शरीप पी. कनोज अल्पसंख्याक जि. कॉग्रेस अध्यक्ष, मालत पडो, अज्जू पठाण सरपंच आलापल्ली, मधुकर सडमेक कॉग्रेस पार्टी आदिवासी सेल तालुका अध्यक्ष अहेरी, नरेंद्र गर्गम, स्वप्नील मडावी कॉग्रेस पार्टी सदस्य आलापल्ली, सचिन पंचार्य, राकेश सडमेक, कवडुजी चल्लावार रा. अडपल्ली चेक कार्यकर्ता, कैलास दुर्गे कार्यकर्ता, मिलिंद बरसागडे कौग्रेस पार्टी कार्यकर्ता, प्रफुल बरसागडे तालुका युवक कॉग्रेस पार्टी चामोर्शी, तेजस कोडेकर तालुका युवक कॉग्रेस सो.मी. अध्यक्ष चामोर्शी, बापू नलगुंटा, अंकुलू आणकरी, कम्बगोनी वैकटेश नगरम, पापय्या राईली, अश्वमेध गोंगले, पाटाळी वत्ते पल्लो कार्यकर्ते गुर्जा, पिंकू बावणे युवा नेते वाडसा, लीलाधर भर्री कार्यकर्ते वाडसा, मोहन पाल राष्ट्रवादी अध्यक्ष (रा.प.), डॉ. शिलू चिमुरकर (पेंदाम) कॉग्रेस आरमोरी, वैष्णवी आकरे, अनिता हरडे, आरती ठाकरे, सुनीता राऊत, उर्मिला बावणे, लक्ष्मी बावणे, सरस्वती बावणे, सतीश विधाते राष्ट्रीय कॉग्रेस पार्टी शहर अध्यक्ष गडचिरोली, रजनीकांत मोटघरे राष्टीय कॉग्रेस पार्टी अनुसूचित जाती जिल्हा अध्यक्ष गडचिरोली, नितेश राठोड, हेमंत मोहितकर आदींनी उपोषण मंडपाला भेट दिली.
.

Latest Posts

Don't Miss