Latest Posts

माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी मेडपल्ली ग्रामपंचायतला भेट घेऊन विविध विषयांवर केली चर्चा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : तालुक्यातील ग्रामपंचायत मेडपल्ली येथे लोकप्रिय माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी मेडपल्ली ग्रामपंचायत व गावातील नागरिकांची भेट घेऊन नागरिकांशी संवाद साधत नाली, रस्ते, आरोग्य सुविधा, शिक्षण व गावांतील विविध विषयांवार चर्चा करण्यात आली. चर्चा दरम्यान मेडपल्ली येथील नागरिकांनी आमच्या समस्या दूर करा म्हणून आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्याकडे चर्चा दरम्यान सांगितले. माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार (Former G.P. President Ajay Kankdalwar) यांनी आपल्या समस्या लवकरात लवकर दूर करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यावेळी गावातील समस्त नागरिकांनी अजय कंकडालवार यांचे आभार मानले.

यावेळी मेडपल्ली ग्रामपंचायत सरपंच निलेश वेलादी, पेरमिली ग्रामपंचायतचे माजी सरपंच प्रमोद आत्राम, माजी जि.प. सदस्य अजय नैताम, माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे, माजी पंचायत समिती सभापती सुरेखा आलाम, अहेरी नगरपंचायत नगरसेवक प्रशांत गोडशेलवार, राकेश सडमेक, प्रमोद गोडशेलवार सह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss