विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : तालुक्यातील रामय्यापेठा येथील अमोल मधुकर सिडाम (वय १४) यांनी गावात खेळण्यासाठी गेला होता. पण सायंकाळी घरी न आल्याने सकाळी आई वडील गावात सांगितल्यावर गावातील नागरीकांनी जंगलात व गावाजवळील तलावाकडे शोध घेतले असता, अमोल तलावात तरंगताना दिसून आला. नंतर अमोल चा शव घेऊन उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. शासकीय नियमानुसार पोलीस केस करून पोस्ट मेडम करण्यात आले. त्यांची घरची परिस्थिती हलाखीची असल्याने शव घेऊन जाण्यासाठी त्यांना आर्थिक मदतची अत्यंत गरज होती.
सदर विषय अजयभाऊ मित्र परिवाराचे तथा आविस चे शहर अध्यक्ष व अहेरी नागरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार यांच्याद्वारे आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांना कळताच क्षणाचा विलंब न करता शव स्वगावी नेण्यासाठी अहेरी नगरपंचायत येथील स्वर्गरथ या वाहनात डिजल टाकून वाहन उपलब्ध करून दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतही केली.
यावेळी उपस्थित अजयभाऊ मित्र परिवाराचे तथा आविस चे शहर अध्यक्ष व अहेरी नागरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, दलसु, जुरू सह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते होते.