Latest Posts

माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांनी सिरोंचा येथील मुलांना (बँड) या वाद्याची खरेदी करिता केली आर्थिक मदत

– (बँड) वाद्य वाजवणाऱ्या शाम जिलेला टीमला मिळाला आधार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा (Sironcha) : स्थानिक नगरपंचायत क्षेत्रातील शाम जिलेला यांची टीम लग्न सोहळे, स्वागत समारंभ, उद्घाटन सोहळे, रैली अशा अनेक कार्यक्रमात ढोल व ताशा (बँड) वाद्य वाजवून आपला उदरनिर्वाह चालवत असे. पण आर्थिक अडचणी मुळे यांच्या समोर नवीन ढोल व ताशा (बँड) हे वाद्य विकत घेण्यासाठी प्रश्न निर्माण ? झाला, त्यामुळे शाम जिलेला यांच्या टीमच्या हाताला काम नसल्याने त्यामुळे ते सर्व चिंतेत होते.

स्थानिक कार्यकर्ते यांनी ही माहिती अहेरी इस्टेटचे दानशूर राजे तथा माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव महाराज आत्राम यांना लक्षात आणून दिली. त्यावेळी राजे साहेबांनी स्थानिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून पासष्ट हजार रुपये किंमतीचे ढोल व ताशा (बँड) हे वाद्य खरेदी करून शाम जिलेला यांच्या संपूर्ण टीमला दिली. यामुळे शाम जिलेला यांच्या टीमला अनेक कार्यक्रमात ढोल व ताशा (बँड) ही वाद्य वाजवून आपली रोजंदारी मिळवण्यासाठी व कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आधार मिळाला. शाम जिलेला टीमने यावेळी राजेंचे हृदयातून आभार मानले.

त्यांचा ढोल व ताशा (बँड) वाद्य वाजविण्याची कला बघून यावेळी राजेंनी आनंद व्यक्त केला.
त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे सिरोंचा तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शाम जिलेला यांच्या टीमचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss