Latest Posts

साठ लाखांच्या निधीतून होणार सिमेंट रस्त्याचे बांधकाम

– माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : तालुक्यातील चिंचगुंडी ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट कोत्तुर येथे साठ लाखांच्या निधीतून सिमेंट काँक्रेट रस्त्याचे बांधकाम होणार असून नुकतेच माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

कोत्तुर येथील सुरेश रामगिरी यांच्या घरापासून ते मोंडी गोलेंटी यांच्या घरापर्यंत कच्चा रस्ता असल्याने पावसाळ्यात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य होत होते. या प्रभागातील नागरिकांनी सिमेंट रस्ता बांधकाम करून देण्यासाठी मागणी केली होती. या प्रभागातील नागरिकांची अडचण लक्षात घेता माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे सदर मागणी रेठून धरली. अखेर ती मागणी मंजूर झाली असून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून हे काम पूर्ण केले जाणार आहे. अंदाजपत्रकानुसार तब्बल ६० लाख रुपयांच्या निधीतून हे काम पूर्ण केले जाणार आहे.

नुकतेच माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते सदर सिमेंट काँक्रेट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.असून या प्रभागातील नागरिकांची मोठी अडचण दूर झाल्याने त्यांनी भाग्यश्री आत्राम यांचे आभार मानले.

सदर भूमिपूजन सोहळ्याला सरपंच कमला बापू आत्राम, रा.कॉ. पार्टीचे अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, नगरसेवक अमोल मुक्कावार, मखमुर शेख, रामू कस्तुरवार, बिच्चु मंचालावार, बापू गानालावार, शंकर बाकोलू, रामन्ना कस्तुरवार, तिरुपती पालेवार, राजू आत्राम, राजाराम कुमरे, राकेश गानालावार, विनोद देवरवार, गागुबाई कंपेलवार, हरीश येमुलवार आदी गावकरी उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss