Latest Posts

वेकोलिच्या वर्कशॉपातून दहा लाखांचे सुटे भाग चोरीला : अद्याप पोलिसांत तक्रार दाखल नाही

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballapur) : १४ मे च्या रात्री बल्लारपूर परिसरातील सास्ती येथील प्रादेशिक वर्कशॉपातून १० लाख रुपये किमतीचे ५ ॲम्प्लीफायर व स्पेअर पार्ट्स चोरीला गेल्यानंतरही वेकोलीच्या धूर्त अधिकारी व सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवला नाही. यावरून त्यांची संशयास्पद भूमिका दिसून येत आहे.

माहितीनुसार, सदर परिसरात रात्र होताच चोरीला सुरुवात होते. याची सर्व माहिती स्थानिक अधिकाऱ्यांना असते. वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी चोरट्यांना भंगार, डिझेल, कोळसा चोरण्याची संधी दिली आहे. अधिकाऱ्यांची इच्छा असेल तर ते खाणीच्या आवारात पक्षीसुद्धा उडू शकत नाहीत, पण तसे केले तर अधिकाऱ्यांचे वरचे उत्पन्न बंद होईल, दिवसा त्यांना कोळसा डीओ धारकांकडून रक्कम मिळते आणि रात्री त्यांना चोराकडून मिळते. अशी चर्चा वेकोली परिसरात सुरू आहे.

Latest Posts

Don't Miss