Latest Posts

जी.एन. साईबाबा निर्दोष : मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : जी.एन. साईबाबा यांचा नक्षलवाद्यांशी संबंधित प्रकरणातील खटल्याचा निकाल आज आला आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या प्रकरणात जी एन साईबाबासह अन्य आरोपींना निर्दोष सोडले आहे. साईबाबा व अन्य साथीदारांनी दाखल केलेले अपीलवर सात सप्टेंबर २०२३ रोजी अंतिम सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर न्यायालयाने हा निर्णय राखीव ठेवला होता. या प्रकरणात गडचिरोली सत्र न्यायालयाने ७ मार्च २०१७ रोजी विजय तिरकीला दहा वर्षे कारावास तर अन्य सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्या विरोधात आरोपी उच्च न्यायालयात गेले होते. उच्च न्यायालयाचा हा निर्णय राज्य सरकार आणि पोलीस दलाला मोठा झटका आहे. आता निकालात जी.एन. साईबाबा, प्रशांत राही, हेम मिश्रा, महेश तिरकी आणि विजय तिरकी या सर्वांची सुटका केली आहे.

साईबाबा यांनी दाखल केलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील अपीलावर आज निर्णय जाहीर केला. या प्रकरणात जी.एन. साईबाबा, प्रशांत राही, हेम मिश्रा, महेश तिरकीसह विजय तिरकी यांची सुटका केली आहे. या प्रकरणात त्यांचा अन्य एक साथीदार पांडू नरोटे याचा २५ ऑगस्ट २०२२ रोजी आजारपणामुळे मृत्यू झाला होता. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा (UAPA) लावताना नियमानुसार कारवाई झाली नव्हती. GN Saibaba acquitted तसेच साईबाबा आणि इतर आरोपींच्या ठिकाणातून पुरावे गोळा करताना नियम पाळले नव्हते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. तसेच प्रोसिक्युशनने ठेवलेले पुरावे जी.एन. साईबाबा आणि इतर आरोपींचे नक्षलवाद्यांशी संबंध सिद्ध करू शकले नाही. या आधारावर जी.एन. साईबाबा, प्रशांत राही, हेम मिश्रा, महेश तिरकी आणि विजय तिरकी या सर्वांची न्यायालयाने सुटका केली

Latest Posts

Don't Miss