– ॲड. सुरेश माने मार्गदर्शन करणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : येणाऱ्या निवडणुकांमध्ये आंबेडकरी जनतेची भूमिका निर्णायक राहणार असून मतांचे ध्रुवीकरण थांबवून घटनाविरोधी भारतीय जनता पक्षाची सत्ता घालविण्यासाठी एकत्र येण्याची हाक देण्यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाच्या वतीने शिवजयंती निमित्याने गडचिरोली येथे २५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता गांधी चौकातील राजीव गांधी भवनात आंबेडकरी कार्यकर्ता महामेळावा व निर्धार सभा आयोजित करण्यात आलेली आहे.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी व मुख्य मार्गदर्शक म्हणून बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. डॉ. सुरेश माने हे राहणार आहेत. या महामेळाव्याचे उद्घाटन शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्री जराते यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. विशेष अतिथी म्हणून अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस रामदास जराते, युवा नेते विनोद मडावी, मैत्री संघाच्या डॉ. उज्वला शेंडे, सत्यशोधक फॉउंडेशन च्या ॲड. सोनाली मेश्राम, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे विदर्भ अध्यक्ष विशेष फुटाणे, विदर्भ महिला सहसंयोजिका डॉ. पूनम घोनमोडे, महासचिव भास्कर बांबोळे उपस्थित राहणार आहेत.
राजकीयदृष्ट्या आंबेडकरी जनतेनें एकत्रित येऊन ताकद दाखविण्यासाठी मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हाप्रभारी राज बन्सोड, जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे, पुरुषोत्तम रामटेके, अरविंद वाळके, प्रितेश अंबादे प्रतिक डांगे, सतिश दुर्गमवार, हेमंत रामटेके, विद्या कांबळे, सविता बांबोळे, तारका जांभूळकर, निलम दुधे, प्रतिमा करमे, रेखा कुंभारे, करुणा खोब्रागडे, राजेश्वरी कोटा, कमलेश रामटेके यांनी केले आहे.