Latest Posts

गडचिरोली : जिल्हाधिकारी कार्यालय समोर अन्यायग्रस्त पोलीस भरती उमेदवारांची बेमुदत उपोषण 

– धनगर समाज संघर्ष समिती जिल्हा गडचिरोली च्या नेतृत्वात
– १० ऑक्टोबर २०२३ पासून सुरुवात
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : पोलीस शिपाई पद भरती मधील भटक्या जमाती (क) प्रवर्गातील बोगस झाडे उमेदवारांची निवड रद्द करून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची नियुक्ती करण्यात यावी व इतर मागणीकरिता पोलीस अधीक्षक, जात पडताळणी समिती, राज्य राखीव पोलीस बल विभागातील विषयावर धनगर समाज संघर्ष समितीच्या नेतृत्वात पोलीस भरतीतील उमेदवार १० ऑक्टोबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत उपोषणाला अन्यायग्रस्त पोलीस भरती उमेदवार, प्रविण लंबूवार, गणेश देवावार, मोरेश्वर पाटेवार, भारत सिर्गावार, खुशाल मल्लेलवार, भोजराज लांबेवार, जितेंद्र काडीवार, अमोल सिदधमवार, मल्लेश येग्गावार, निखिल उमलवार, अक्षय मिडपलवार, भोलेश्वर फेबुलवार, राहूल अन्नावार, शुभम सिर्गावार, प्राची मेडेवार उपस्थित होते.

गडचिरोली जिल्ह्यात झाडें कुणबी या जातीतील कुणबी हा शब्द वगळून धनगर व तत्सम जातीतील अनुक्रमांक १५ वरील झाडें या पोटजातीचा आधार घेऊन नामसदृश्यतेचा गैरफायदा घेत भटक्या जमाती (क) प्रवर्गातील असल्याचे दाखवून खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे पोलीस भरतीमध्ये नियुक्त झालेले आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस भरती २०२१ व सन २०२२ मध्ये १३ बोगस झाडे उमेदवारांची निवड झाली तर राज्य राखीव पोलीस भरती २०२२ मध्ये ५ बोगस उमेदवारांची निवड झाली. त्यामुळे खऱ्या भटक्या जमाती क प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय झालेला आहे. गडचिरोली पोलीस भरती २०२१ मध्ये नियुक्त झालेले भटक्या जमाती (क) प्रवर्गातील बोगस झाडें उमेदवारांनी सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना बडतर्फ करण्यात यावे, गडचिरोली पोलीस भरती २०२२ मध्ये निवड झालेले भटक्या जमाती (क) प्रवर्गातील उमेदवार ज्यांची जात वैधता रद्द झालेली आहे. त्यांचेवर गुन्हे दाखल करून निवड रद्द करण्यात यावी.

भटक्या जमाती (क) मधील बोगस झाडें उमेदवारांचे जात पडताळणी समिती गडचिरोली यांनी तात्काळ जात वैद्य/अवैद्य ठरवावे, गडचिरोली पोलीस भरतीतील प्रतीक्षा यादीतील खऱ्या भटक्या जमाती (क) उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात यावे, राज्य राखीव पोलीस भरती काटोल येथील बोगस झाडें उमेदवारांना बडतर्फ करण्यात यावे. या मागण्या घेऊन धनगर समाज संघर्ष समितीच्या नेतृत्वात बेमुदत उपोषण १० ऑक्टोबर २०२३ पासून करण्यात आली.

यावेळी डॉ. तुषार मर्लावार नागपूर विभाग अध्यक्ष, विजय कोरेवार माजी सभापती पं.स.सावली, लचसा शिर्गावार जिल्हाध्यक्ष गडचिरोली, संजय कन्नावार, मुखरू ओगेवार, राजाराम उईनवार, क्रिष्णा गंजेवार, राजू कंचावार, युवा कार्यकर्ता, राहुल डंकरवार, युवा कार्यकर्ता, सुरेश कन्नमवार, बिराजी शिर्गावार, दिलीप कोरेवार, बिराजी मल्लेलवार, शंकर कन्नमवार, प्रभाकर येगडेवार इत्यादी जास्त संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss