Latest Posts

गडचिरोली पोलीस दल प्रोजेक्ट उडान अंतर्गत रोजगार मेळाव्याचे आयोजन

– १७७ युवक- युवतींना मिळाला नवीन रोजगार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : गडचिरोली जिल्हयातील गरजू युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडाण अंतर्गत पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांचे मार्गदर्शनाखाली नागरी कृती शाखेच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगार युवक- युवतींकरीता गडचिरोली पोलीस दल, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन राळेगाव, अमर सेवा मंडळ नागपूर आणि एसआयएस कंपनी चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज १० जून २०२४ रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन पोलीस मुख्यालय परिसरातील एकलव्य हॉल येथे करण्यात आले.

सदर रोजगार मेळाव्याकरिता ०५ जून २०२४ ते ०९ जून २०२४ रोजी पर्यंत कुरखेडा, धानोरा, गडचिरोली, कारवाफा, हेडरी, एटापल्ली, भामरागड, अहेरी, जिमलगट्टा व सिरोंचा येथे उपविभागीय स्तरावर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यामध्ये दुर्गम अतिदुर्गम भागातील विविध प्रकारच्या रोजगार प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी ७०० च्या वर बेरोजगार युवक- युवती सहभागी झाले होते. यामधून आज पार पडलेल्या रोजगार मेळाव्यात प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन राळेगाव यांचे मार्फत हॉटेल मॅनेजमेंट- २०, आटोमोबाईल १५, इलेक्ट्रीशिअन- १५, नार्सिग असीस्टंट ३० तसेच अमर सेवा मंडळ नागपूर यांचे मार्फत आयटी हार्डवेअर व टिव्ही असेंब्ली ऑपरेटर करीता २० व एसआयएस कंपनी चंद्रपूर यांचे मार्फत सिक्युरिटी गार्ड करिता ७७ अशा एकूण १७७ उमेदवारांची निवड प्रशिक्षणाकरीता करण्यात आली. प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आले. विविध प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या उमेदवारांचे अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता यांनी कौतुक केले असून, त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मार्गदर्शन करतांना अपर पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, गडचिरोली जिल्हयातील युवक-युवतींना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव तत्पर असून, नेहमी तुमच्या पाठीशी राहील, आपले मित्र व आप्तस्वकीय यांना देखील रोजगाराच्या बाबतीत अवगत करून त्यांनी देखील गडचिरोली पोलीस दलाने उपलब्ध करून दिलेल्या रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा व आपल्या कुटूंबियांचे राहणीमान उंचवावे.

आतापर्यंत गडचिरोली पोलीस प्रशासनाकडुन रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याद्वारे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन सुरक्षा रक्षक ६७०, नर्सिंग असिस्टंट १ हजार २६२, हॉस्पीटॅलीटी ३६३, ऑटोमोबाईल ३६१, इलेक्ट्रीशिअन २६८, प्लंम्बींग ३५, वेल्डींग ३८, जनरल डयुटी असिस्टंट ४०३, फील्ड ऑफीसर ११ व व्हीएलई ५२, सेल्समॅन ५, वेब डेव्हलपर ३०, टीव्ही असेंब्ली ऑपरेटर ६०, सॉफ्टवेअर डेव्हलपर १२०, पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण १ हजार ४६२ व किसान मोटर्स १५५ असे एकुण ५ हजार २६५ युवक/युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन (आत्मा) सोनापुर, गडचिरोली व बीओआय आरसेटी गडचिरोली यांचे मार्फत ब्यूटीपार्लर २७४, मत्स्यपालन १४७, कुक्कुटपालन ६६२, बदक पालन १४०, वराहपालन १०, शेळीपालन २४७, शिवणकला २७७, मधुमक्षिका पालन ६३, फोटोग्राफी १००, भाजीपाला लागवड १ हजार ८४३, मोटर मेकॅनिकल प्रशिक्षण १२९, फास्ट फुड १९७, पापड लोणचे १२१, टु/फोर व्हिलर प्रशिक्षण १ हजार ११०, एमएससीआयटी २३१, कराटे प्रशिक्षण ४८, ज्युट प्रोडक्ट ३५, केक ६२ व सॉफ्ट टॉईज प्रशिक्षण ७०, सिसिटीव्ही कॅमेरा २५ असे एकूण ५ हजार ६१९ युवक-युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे.

सदर रोजगार मेळावा कार्यक्रमास पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी एम. रमेश तसेच प्रथम एज्युकेशन फाउंडेशन राळेगाव येथील संस्था प्रमुख आशिष इंगळे, ट्रेनर श्याम महींगे, ट्रेनर किशोर काळे, मोचलायझेशन एसआयएस (सिक्युरिटी) चंद्रपूर चंदू कारसुरपे व संगम धांडे हे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सर्व उपविभागीय अधिकारी सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकेंचे प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. धनंजय पाटील, पोउपनि, चंद्रकांत शेळके व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

Latest Posts

Don't Miss