Latest Posts

गडचिरोली पोलीस दलास हरवलेले मोबाईल शोधून काढण्यात यश

– सायबर पोलीस ठाणे गडचिरोली कडुन शोध घेतलेल्या ५२ मोबाईल व ०१ टॅबचे वाटप

विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : तरुणपिढी मोठ्या प्रमाणात मोबाईलचा वापर करीत असुन मोबाईल हाताळतांना तसेच प्रवासादरम्यान मोबाईल हरविले गेल्यानंतर किंवा चोरीस गेल्यानंतर सदरची तक्रार संबंधित पोलीस स्टेशनच्या मार्फतीने गडचिरोली पोलीस दलाच्या सायबर पोलीस स्टेशन गडचिरोली येथे तक्रार नोंदविली जाते. सदर बाबत सायबर पोलीस स्टेशनमध्ये चोरीस गेलेल्या तसेच हरवलेल्या मोबाईलचा शोध घेतला जातो.

मोबाईल हरवला किंवा चोरीस गेल्यास सदर मोबाईलव्दारे सायबर गुन्हे घडण्याची जास्त शक्यता असल्यामुळे हरवला किंवा चोरीस गेलेल्या मोबाईलचा लवकरात लवकर शोध घेणे आवश्यक आहे. या बाबींचा विचार करुन सायबर पोलीस स्टेशन मार्फत हरवलेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध लवकरात लवकर घेण्यात येतो. मागील वर्षी सन २०२३ मध्ये एकुण १३५ मोबाईलचे शोध घेण्यात आले असुन त्यांची अंदाजे किंमत एकुण २० लाख २७ हजार रुपये एवढी आहे. तसेच माहे जानेवारी २०२४ ते मार्च २०२४ पर्यंत एकुण ५२ मोबाईल व ०१ टॅब मिळुन आले असुन त्यांची किंमत ७ लाख ३१ हजार ७५२ एवढी असल्याने सदरचे मोबाईल आज १३ मार्च २०२४ रोजी संबंधितांना पोलीस मुख्यालयातील एकलव्य धाम येथे बोलावुन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे हस्ते प्रदान करण्यात आले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख व अपर पोलीस अधीक्षक अहेरी एम. रमेश अहेरी यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोस्टे येथील प्रभारी अधिकारी पोनि. उल्हास भुसारी, पोउपनि निलेश वाघ व पोलीस अंमलदार नापोअं/१०८६ श्रीनीवास संगोजी, मनापोअं/६३८ वर्षा वहिरवार, मनापोअं/२९१८ संगणी दुर्गे, मनापोअं/गायत्री नैताम व मपोअं/किरण रोहणकर यांनी पार पाडली.

यावेळी बोलतांना पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जनतेला आवाहन केले की, सध्या सायबर गुन्ह्राचे प्रमाण वाढत असुन, सायबर गुन्हेगारामार्फत लोकांची वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवुन फसवणुक केली जाते. त्यामुळे जनतेने सायबर गुन्हेगारांपासुन सावध राहावे व मोबाईल चोरी झाला असेल तर, तात्काळ ceir.gov.in या पोर्टलवर आपण तक्रार नोंदवावी. तसेच आपला ऑनलाईन आर्थिक फ्रॉड झाला असेल तर १९३० या नंबरवर तक्रार नोंदवावी. यासोबतच मोबाईल कुठे हरवल्यास किंवा चोरी झाल्यास न घाबरता पोलिसांवर विश्वास ठेवुन तात्काळ जवळच्या पोस्टे/उपपोस्टे/पोमकें तसेच सायबर पोलीस स्टेशन गडचिरोली यांचेशी संपर्क साधावा.

Latest Posts

Don't Miss