Latest Posts

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडाण च्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा सराव पेपरचे आयोजन

– एक गाव एक वाचनालय अंतर्गत नोंदणी केलेल्या विविध पोस्टे/उपपोस्टे/पोमकें स्तरावरुन एकुण २ हजार ५०० विद्यार्थ्यांनी दिला सराव पेपर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थी हे दुर्गम-अतिदुर्गम भागात राहतात. त्यामुळे तेथील विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शन व संधीचा अभाव आहे. तसेच दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा बद्दल असलेल्या अज्ञानामुळे, त्यांना मिळत नसलेल्या योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे विद्यार्थी हे स्पर्धा परिक्षेत मागे पडत आहेत. करीता शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची व स्पर्धापरिक्षा विषयीची ओढ निर्माण व्हावी, त्यांची उज्वल भविष्याकडे वाटचाल व्हावी व त्यांचा स्पर्धा परिक्षेकडे कल वाढावा तसेच त्यांना स्पर्धा परिक्षेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गडचिरोली पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून व यशोरथ स्पर्धा परीक्षा टेस्ट सिरीज, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने प्रोजेक्ट उडाण अंतर्गत आज १७ ऑगस्ट २०२३ रोजी पासून सुरु होणाऱ्या तलाठी भरती पेपरच्या पार्श्वभूमीवर १६ ऑगस्ट २०२३ रोजी गडचिरोली पोलीस मुख्यालय येथील शहिद पांडु आलाम सभागृह तसेच एक गाव एक वाचनालयाअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पोस्टे/उपपोस्टे / पोमकें ठिकाणी उभारण्यात आलेल्या प्रत्येक वाचनालयामध्ये मोफत तलाठी भरती सराव पेपर क्र. ०२ टेस्ट सिरीज चे आयोजन करण्यात आले. याचा उपयोग विद्याथ्यांना येणाऱ्या तलाठी, वनरक्षक, संयुक्त परीक्षेकरीता होणार आहे.

यावेळी सदर स्पर्धा परीक्षा सराव पेपर करीता पोलीस मुख्यालय व विविध पोस्टे/उपपोस्टे / पोमकें स्तरावरून एकुण २ हजार ५०० विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. दुर्गम भागातील भामरागड, अहेरी, एटापल्ली, हेडरी व सिरोंचा या ठिकाणी ही विद्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतीसाद दिला. तसेच नव्याने उभारण्यात आलेल्या पोलीस मदत केंद्र पिपली बुर्गी हद्दीतील १० विद्यार्थ्यांनीही या सराव पेपरमध्ये सहभाग घेतता. अनेक ठिकाणी वाचनालय तसेच ग्रामपंचायत कायालयाच्या ठिकाणी परीक्षा घेण्यात आल्या. या आयोजीत सराव पेपर दरम्यान अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी शहिद पांडु आलाम सभागृहामध्ये घेतलेल्या सराव पेपरला उपस्थित ४५० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व १७ ऑगस्ट २०२३ रोजी पासून सुरु होणाऱ्या तलाठी भरती पेपर करीता गडचिरोली पोलीस दलातर्फे शुभेच्छा दिल्या. तसेच भविष्यात येणाऱ्या वनरक्षक, आरोग्य सेवक, कृषी सेवक, पोलीस भरती इ. परिक्षांचे सराव पेपर सुरु करत असल्याबाबतची माहीती दिली.

या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता तसेच समाज कल्याण कार्यालय गडचिरोलीचे ग्रंथालय प्रमुख महेंद्र जनबंधु, स्वप्नील मडावी अकॅडमी इंदीरानगर गडचिरोलीचे स्वप्नील मडावी, ऐम्स अकॅडमी गडचिरोलीचे प्रफुल मडावी हे उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे/उपपोस्टे/पोमकेचे सर्व प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. धनंजय पाटील व सर्व पोलीस अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

Latest Posts

Don't Miss