Latest Posts

गडचिरोली : सिटु संघटनेच्या वतीने अंगणवाडी सेविकांचा जबाब-दो आंदोलन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : ३५ दिवसापासुन बेमुदत काम बंद आंदोलन करुनही सरकार मागण्या मान्य करत नसल्याने संतप्त असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आज मंगळवार ९ जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्ह्या दौरा आगमना प्रसंगी जबाब-दो आंदोलन केले.

गडचिरोली च्या मुख्य रस्त्यावर अभिनव लॉन जवळ आंदोलन करण्यात आले असून या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमानात तैनात करण्यात आले होते.

यामध्ये किमान २६ हजार रु. वेतन देण्यात यावे, ग्रेच्युटी देण्यात यावे, सर्वाना ५ हजार रु. पेन्शन देण्यात यावे अशा या मागण्याकरीता जबाब-दो आंदोलने करण्यात आले. यावेळी कॉ. अमोल मारकवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे मागणी केली.

या आंदोलनात कॉ. रमेशचंद्र दहिवडे, कॉ. अमोल मारकवार, कॉ. अरुण भेलके, कॉ.डॉ. धर्मराव सोरदे, उज्वला उंदिरवाडे, कौशल्य गोरकार, सुशीला मंगरे, योगिता मुनघाटे, सुनंदा बावने, छाया कागदेलवार, अर्चना ढवळे, माधुरी चुनारकर, अर्चना रामटेके, राजेश्री लेखामी, कॉ. फकिराजी ढेंगणे, प्रेमिला झाडे  ईत्यादी सेविका सह ८४५ महिला सहभागी झाल्या होत्या. तसेच या आंदोलनात शेकापचे रामदास जराते, अक्षय कोसनकर, बिआरएसपी चे राज बन्सोड, आदिवासी युवा संघटनेचे कुनाल कोवे, रिपब्लिकन पक्षाचे उदिरवाडे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला.

Latest Posts

Don't Miss