Latest Posts

गणरायांच्या आरतीला माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा सह कुटुंब उपस्थिती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : तालुक्यातील अल्लापल्ली येथील जय श्रीराम गणेश मंडळ न्यू फ़ॉरेस्ट कॉलनी येथे महापूजा आरती कार्यक्रम आयोजित केले.

सदर आरती कार्यक्रमाला आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार व अहेरी पंचायत समिती सभापती सोनाली अजय कंकडालवार यांनी उपस्थित राहून बाप्पाचे दर्शन घेत आरती केली.

अल्लापल्ली येथील दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा जय श्रीराम गणेश मंडळ न्यू फ़ॉरेस्ट कॉलनी येते भव्य मूर्तीचे स्थापन केली आहे. त्यावेळी अजय यांनी गणरायांणकडे गडचिरोली जिल्ह्यातील समस्त जनतेला- बळीराजा सुख समृध्दी शांती आरोग्य लाभू दे हीच गणराया चरणी प्रार्थना केली. त्यादरम्यान मंडळतर्फे महाप्रसाद अन्नादान सुद्धा करण्यात आली. त्यावेळी माजी जि.प.अध्यक्षांनी सहकुटुंब अन्नादान कार्यक्रमास उपस्थिती राहून अन्नदान केले.

यावेळी उपस्थित माजी जि.प. सदस्य अजय नैताम, अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, नरेश गर्गम, प्रमोद गोडसेलवार सह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss