Latest Posts

गांजा सहित दोन आरोपींना अटक : राजुरा पोलिसांची धडक कारवाही

– घरी लावत होते गांजाचे झाड

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : राजुरा पोलिसांनी धडक कारवाही करीत गांजा सहित दोन आरोपींना अटक केली आहे.

राजुरा पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, तालुक्यातील देवाडा येथील राजू लछमु कोवे व शंकर अर्जुन आत्राम यांच्या घराच्या आवारात गांजाची १५ झाडे व घरात ओलसर गांजा आहे. त्यावरून राजुराचे पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांनी सहकाऱ्यांसह १९ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत अंदाजे ९ लाख ७४ हजार ९०० रुपये किमतीचा ८५ किलो ६९० ग्रॅम गांजा, झाडाझुडपासह जप्त करण्यात आला असून आरोपी राजू लछमु कोवे (५५) व शंकर अर्जुन आत्राम (२५) वर्ष या दोघांविरुद्ध अपराध क्र. ६९१/२०२३ कलम २०,२२ एनडीपीएस ॲक्ट १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाही पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मेंद्र जोशी, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हाके, ओमप्रकाश गेडाम, पोलीस हवालदार किशोर तुमराम, सचिन पडवे, कैलास आलाम, पोशी योगेश पिदुरकर, रामराव बिंगेवाड, महेश बोलगोडवार, आकाश पिपरे, मपोशी रंजना सोनपिपरे यांनी केले. याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असून दोन दिवसांचा पीसीआर प्राप्त झाला आहे.

Latest Posts

Don't Miss