विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : काल ९ मार्च रोजी भारत- न्यूझीलंड मध्ये अंतिम सामना रंगात असताना घुग्गुस येथील काँग्रेस नेते राजु रेड्डी यांचा घरावर गोळीबार झाल्याची अफवा पसरवली होती. त्यातच गोळीबार झाल्याची घटना म्हंटले त्यामुळे घुग्गुस चे वातावरण तापले होते. घुग्गुस पोलीस स्टेशन चे अधिकारी व कर्मचारी लगेच घटनास्थळी पोहोचले. वरिष्ठांना माहिती दिली गेली. काही मिनिटातच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आले. तपास केले असता गोळीबार घटना ती निव्वळ अफवा होती असे तपासात दिसले.
९ मार्च रोजी पोलीस स्टेशन घुग्घुस हद्दीतील राजु रेड्डी यांचे घरातील पहिल्या मजल्यावर किरायाने राहत असलेले अनुपसिंग चंदेल यांच्या पोर्च मध्ये मिळुन आलेल्या काडतुसच्या समोरील रिकामा केस च्या माहिती वरून सदर ठिकाणी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन तसेच पोस्टे घुग्गुस प्रभारी अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे समवेत फॉरेन्सिक टिम, बीडीडीएस टिप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे सह विविध पथके, श्वान पथके तसेच शस्त्रागार आरमोरर टिम यांनी भेट दिली आहे. सदर प्रकरणी प्राप्त फिर्याद वरुन पोस्टे ला भारतीय हत्यार कायदान्वये कायदेशीर गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. सदर गुन्हयात बॅलेस्टीक एक्सपर्ट यांना पाचारण करून तज्ञांचा अहवाल घेण्यात येत आहे.
प्राथमिक चौकशीत सदर ठिकाणी गोळीबार झाल्याचे काही चिन्ह दिसुन आलेले नाहीत.
सदर गुन्हयाचा सखोल तपास सुरु असुन गोळीबार झाल्याचे खोटी अफवा पसरवुन लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करु नये, असे चंद्रपूर जिल्हा पोलीस द्वारे आवाहन करण्यात येत आहे.