Latest Posts

नागेपल्ली येथे भव्य टेनिस बॉल ३० यार्ड क्रिकेट सर्कल सामने आयोजित

– माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते विजेत्या संघाला बक्षीस वितरण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : तालुक्यातील नागेपल्ली येथे श्रीमंत राजे क्रिकेट क्लब यांच्या सौजन्याने भव्य टेनिस बॉल ३० यार्ड क्रिकेट सर्कल सामने नागेपल्ली येथील पटांगणावर आयोजित करण्यात आले होते.

मोठ्या संख्येने क्रिकेट स्पर्धकांनी या रात्रकालीन भव्य टेनिस बॉल ३० यार्ड क्रिकेट स्पर्धेसाठी आपला सहभाग नोंदविला होता.

यावेळी या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक विजेत्या संघाला ट्रॉफी व ५० हजार रुपये माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून तर द्वितीय क्रमांक विजेत्या संघाल ट्रॉफी व ३० हजार रुपये युवा नेते कुमार अवधेशरावबाबा आत्राम यांच्या कडून आणि तृतीय क्रमांक विजेत्या संघाल ट्रॉफी व २० हजार रुपये मिलिंद भाणारकर व संजय हलदार यांच्या तर्फे देण्यात आले.

या भव्य टेनिस बॉल ३० यार्ड क्रिकेट सामने यांच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम होत तर प्रमुख अतिथी म्हणून युवा नेते कुमार अवधेशराव आत्राम हे होते. विजेत्या संघाला यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. त्यावेळी माजी राज्यमंत्री माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी संपूर्ण क्रिकेट स्पर्धकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी पोलीस पाटील गणपत गुरनुले, सामाजिक कार्यकर्ते सागर बिट्टीवार, सारय्या गडमवार, जाकीर सय्यद, बंडू मोहूर्ले, जेष्ठ नागरिक गोवर्धन कोकुलवर, विनोद कोटरंगे, संजय हलदार क्रिकेट स्पर्धक आणि युवावर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss