Latest Posts

जागतिक पॅलिएटिव्ह केअर दिनानिमीत्य कर्करोग ग्रस्त रुग्णांची आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबीर संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : राष्ट्रीय पॅलिएटिव्ह केअर (उपशामक सेवा) कार्यक्रम जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली अंतर्गत केमोथेरपी युनिट येथे मा. डॉ. प्रमोद खंडाते जिल्हा शल्यचिकीत्सक व डॉ. सतिश सोलंके अति. जिल्हा शल्यचिकीत्सक सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांचा मार्गदर्शनाखाली जागतिक पलिएटिव्ह केअर दिन ०९ ऑक्टोबर २०२३ रोजी सोमवार ला साजरा करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ. सतिश सोलंके अति. जिल्हा शल्यचिकीत्सक, प्रमुख पाहूने डॉ. इंद्रजित नागदेवते, डॉ. माधुरी किलनाके, डॉ. मनिष मेश्राम, डॉ. दीक्षांत मेश्राम, डॉ. स्वाती साठे, डॉ. दिक्षा सोनकुवर, सपना आईचंवार सहाय्यक अधिसेवीका, मंजूषा बंड केमोथेरपी इंचार्ज आदी मान्यवर, कर्करोग ग्रस्त रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.

या कार्यक्रमाची रूपरेषा व प्रस्तावना राहुल कंकनालवार यांनी आपल्या मार्गदर्शनातून केले. पॅलिएटिव्ह केअर म्हणजे जे रुग्ण दिर्घकाळापासून किंवा मोठ्या आजाराने ग्रस्त असेलल्या उदा. कर्करोग, एच.आय.व्ही.टी.बी. किडणी विकार, श्वसनाचे आजार, मानसिक आजार आंतरून किडलेला रुग्ण, वयोवृध्द इ. रुग्णांना होणारा त्रास कमी करण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक व आरोग्य अधिकारी कर्मचारी एकत्र येवून घेतलेली संपूर्ण काळजी म्हणजेच रुग्णांची शारिरीक, मानसिक, सामाजिक, आत्मीक गरज पूर्ण करणे ज्या रुग्णा आपले आयुष्य आरामात व आदराने जगू शकतो, रुग्ण व नातेवाईक याचातील मतभेद दूर करणे रुग्णांना गृहभेटी व्दारे समूपदेशन, ड्रेसींग व इतर सेवा गडचिरोली जिल्हयात पॅलिएटिव्ह केअर चमू देत आहे. आपण कर्करोग ग्रस्त रुग्णांना करीता केमोथेरपी युनिट सामान्य रुग्णालय गडचिरोली मार्फत केमोथेरपी मार्फत सेवा देण्यात येत आहे. आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केले. त्यानंतर डॉ. इंद्रजित नागदेवते भिषकतज्ञ यांनी आपल्या मार्गदर्शनातून रुग्नांनी केमोथेरपी उपचारानंतर नियमित तपासणी करीता रुग्णालयात येणे तसेच सध्याच्या वाढत्या आजारानुसार उच्च रक्तदाब व मधुमेहाची तपासणी नियमित करून घेणे. ज्यांना उच्च रक्तदाब व मधुमेह आहे. त्यांनी नियमित औषधोपचार घ्यावे व डॉ. माधुरी किलनाके यांनी आपल्या मार्गदर्शनातून आपल्या शरिरावर कोणतेही प्रकारची गाठ आढळल्यास तज्ञ डॉक्टरांकडून लवकर तपासणी करून निदान व उपचार करून घेण्यात यावे. व गडचिरोली जिल्हयातील नागरीकांना कर्करोगाचे लक्षणे दिसल्यास लवकर उपचार करून घ्यावे, असे आव्हान आपल्या मार्गदर्शनातून लाक्त केले. डॉ. मनिष मेश्राम यांनी उच्चरक्तदाब व मधुमेह हे नियंत्रित नसल्यास किडनीचे विकार व इतर आजार होऊ शकते व संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. शेवटी अध्यक्षीय भाषण डॉ. सतिशकुमार सोलंके यांनी उपस्थित असलेल्या सर्व रुग्णांना नियमित औषधोपचार घ्यावे नियमित व्यायाम करावे. सुगंधीत तंबाखुजन्य पदार्थापासून दूर राहुत आरोग्याची काळजी घ्यावी, असे आव्हान गडचिरोली जिल्हयातील नागरीकांना आपल्या मार्गदर्शनातून केले.

सदर कार्यक्रमादरम्यान सर्व उपस्थित कर्करोगग्रस्त रुग्णांची तपासणी करुण रुग्णांना आभा कार्ड वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन दिनेशा बोरगडे यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेंद्र अल्लीवार यांनी केले तर कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता, निलेश सुभेदार, राहुल चावरे, विजय सिडाम, वैशाली बोबाटे, शिल्पा मेश्राम, प्रणाली ठेंगणे, शिल्पा सरकार, मिना दिवटे, स्नेहा गेडाम, सिमा बिस्वास, प्रतिभा आत्राम, संदिप मोटघरे, तुराब शेख, किरण रघुवंशी व सर्व राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम व टाटा कर्करोग प्राजेक्ट चमू सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील अधिकारी व कर्मचारी सहकार्य केले.

Latest Posts

Don't Miss