– २७ लाखाचा मुद्देमाल जप्त
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chanrapur) : राजुरा परिसरातून लक्कडकोट मार्गे हैद्राबाद (तेलंगाना) शहरात विनापरवानगी २५ बैल घेऊन जाणाऱ्या कंटेनरला विरुर पोलिसांनी जप्त करून त्यातून २५ बैलांची सुटका केली. हे सर्व बैल कत्तलीसाठी जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
१४ मार्च रोजी विरुर पोलीस स्टेशन चे स्टॉप खाजगी वाहणाने लक्कडकोट परिसरात पेट्रोलींग करीत असताना मुखबिर कडुन खबर मिळाली की, राजुरा कडुन लक्कडकोट मार्गे हैद्राबाद (तेलंगाना) येथे एका तेलंगाना पासिंग च्या कंटेनरमध्ये जनावराची वाहतुक होत आहे अशा माहीती वरुन विरूर पोलिसांनी आर.टी. ओ. नाका, लक्कडकोट येथे पंचासमक्ष नाकाबंदी केली असता रात्रो ११.३० वाजताच्या दरम्यान आर.टी.ओ. नाका येथे एक कंटेनर येताना दिसले तेव्हा कंटेनरला हात दाखवुन थांबविले असता कंटेनरच्या चालकाने कंटेनर रोडच्या बाजुला थांबवीले.
सदर कंटेनर हे भारत बेन्ज कंपनीचे क. TS १२ UD ५३२१ असे होते. सदर वाहनातील इसमांना नावे विचारली असता, चालक नामे सैय्यद फारुख सैय्यद युसुफ (३८) रा. महमुद नगर, किशनबाग, बहादुरपुरा हैद्राबाद (तेलंगाना) तसेच शेख जलील मोहमद शेख (३८) रा. इलीयासनगर ता. नारनुर जि. अदिलाबाद (तेलंगाना), कबिर जैनुद्दीन शेख (२५) रा. गुडसेला ता. जिवती जि. चंद्रपुर असे सांगितले. त्यांना सदर वाहणाबाबत असता तिघेही उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याने पोलिसांनी सदर कंटेनरची पंचासमक्ष पहाणी केली असता सदर वाहणामध्ये दाटीवाटीने हालचाल करता येणार नाही व चारापाण्याची व्यवस्था न करता बैल जातीचे २५ नग जिवंत जनावरे मिळुन आले. सदर जनावरे कोणाचे आहे व कुठे घेवुन जात आहे अशी विचारणा केली असता सदरचे जनावरे हे गडचांदुर येथील अज्जु कुरेशी यांची असल्याची व हैद्राबाद येथे कत्तलखाण्यात घेवुन जात असल्याचे सांगितल्याने त्यांचे ताब्यातुन एकुण २५ नग जिवंत बैल प्रत्येकी किं. २५ हजार रु. प्रमाणे ६ लाख २५हजार रु. व भारत बेन्ज कंपनीचा कंटेनर क. TS १२ UD ५३२१ अंदाजे किं. २१ लाख रु. असा एकुण २७ लक्ष २५ हजार रु. चा मुद्देमाल मिळुन आल्याने ताब्यात घेवुन विरूर पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुध्द अप क्र. ७७/२४ महा. प्राणी संरक्षण अधिनियम- १९७६ चे कलम ५ ब, ९, ११, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (क), मोटरवाहन अधिनियम- १९८८ चे कलम १८४ अन्वये गुन्हा नोंद करुन नमुद आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधु तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा दिपक साखरे यांचे मार्गदर्शनात विरूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार सपोनी संतोष वाकडे, पोहवा. सुभाष कुळमेथे, नापोअ. विजय मुंडे, पोअं. राहुल वैद्य, प्रमोद मिलमिले,सचिन थेरे, अतुल शहारे, गजानन चारोळे, रामदास निलेवार, प्रविन जुनघरे, चालक पोअं. काकासाहेब यांनी केले.