Latest Posts

भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : भारतीय सेनेच्या तिन्ही दलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सीडीएस- ६३ या परीक्षेची पूर्व तयारी करण्यासाठी छात्र पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी १० जून २०२४ ते २३ ऑगस्ट २०२४ या कालावधीत सीडीएस- ६३ कोर्स आयोजित करण्यात येत आहे. सीडीएस कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थीना निशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते. इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नागपूर, येथे २८ में २०२४ ला मुलाखतीस हजर राहावे.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी: training.petenashik@gmail.com व दूरध्वनी क्रमांक ०२५३-२४५१०३२ किंवा व्हाटसअप क्र. ९१५६०७३३०६ असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नागपूर यांनी केले आहे.

.

Latest Posts

Don't Miss