Latest Posts

गोंडवाना सैनिकी विद्यालय गडचिरोली येथे सेमिनार स्पर्धा संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : गोंडवाना सैनिकी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय गडचिरोली येथे ऑक्टोंबर महिन्यात वर्ग ११ च्या विद्यार्थ्यांची सेमिनार स्पर्धा घेण्यात आली.

या स्पर्धेत इयत्ता ११ वी चे १६ विद्यार्थी स्वेच्छेने सहभागी झाले. यात प्रथम क्रमांक कॅडेट मास्टर श्रीरंग अलोने (फोटोत असलेला विद्यार्थी) तर द्वितीय क्रमांक कॅडेट मास्टर वेदांत घुमे आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दोन विद्यार्थी कॅडेट मास्टर हर्ष उके व कॅडेट मास्टर प्रणव मेश्राम याने प्राप्त केला.

बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य संजीव गोसावी तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे पर्यवेक्षक अजय वानखेडे, प्रा. संदीप कोटांगले, प्रा. गजानन ढोले, प्रा. विजय गोंडाने, प्रा. काशिनाथ भोंगाडे होते.

विद्यार्थ्यांच्या जीवनात या स्पर्धेच्या युगात व्यक्तिमत्व विकासाला अनन्यसाधारण महत्त्व असून अशा स्पर्धांचा यात मोलाचा वाटा असतो, असे मत प्राचार्य संजीव गोसावी यांनी मांडले.

कार्यक्रमाचे आयोजन व संचालन प्रा. डॉ. राकेश चडगूलवार यांनी केले.

Latest Posts

Don't Miss