Latest Posts

गोंडवाना विद्यापीठात होणार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन केंद्राचे उद्घाटन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन केंद्राचे उद्घाटन गुरुवार १२ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १२.३० वाजता होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे, मुख्य अतिथी म्हणून खासदार गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघ अशोक नेते, उद्घाटक तथा मार्गदर्शक वर्धा येथील अभ्यासक तथा प्रमुख वक्ते प्रकाश महाराज वाघ प्रमुख उपस्थिती, प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे राहणार आहे.

सदर कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन व समन्वयक (अध्यासन केंद्र) डॉ. विनायक शिंदे यांनी केले आहे.

Latest Posts

Don't Miss