Latest Posts

सरकारी कंत्राटी भरतीचा जी.आर. रद्द करणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी मानले आभार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : राज्यातील बहुतांश सरकारी कर्मचाऱ्यांचे पदे हे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा महाविकास आघाडी सरकार असतांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला होता. ह्याला कांग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने समर्थन दिले होते, राज्यभर ह्या निर्णयाला प्रचंड विरोध झाल्यावर अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेऊन हा काळा जी.आर. रद्द करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. याबद्दल माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा महायुती सरकारचे अभिनंदन केले आहे. सरकारी कंत्राटी भरतीचा जी.आर. रद्द करावा, अशी मागणी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम काही महिन्यांपूर्वीच एक पत्र देऊन देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती हे विशेष.

शिक्षकांच्या कंत्राटी भरतीवरून राज्यभरात गदारोळ झाल्यानंतर आता अखेर राज्य सरकारने एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. कंत्राटी भरतीचा जीआर आम्ही रद्द करणार असल्याची घोषणा भाजपा नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आधीच्या सरकारांनी केलेले पाप आपल्या माथी नको, अशी भूमिका मांडत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली असून सरकारी कंत्राटी भरतीचा जीआर आम्ही रद्द करणार आहोत, अशी माहिती फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत काल दिली होती. या निर्णयाने बेरोजगार युवकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Latest Posts

Don't Miss