Latest Posts

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक सुविधांचा घेतलेल्या आढाव्याचा सकारात्मक प्रस्ताव द्या : खा. अशोक नेते

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : गडचिरोलीत होऊ घातलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मेडिकल काँसिल आँफ इंडियाकडून मान्यता मिळून हे महाविद्यालय लवकरात लवकर सुरू करण्यासंदर्भात सुविधांचा आढावा घेण्यात आला. यावेळी खा. अशोक नेते यांनी रुग्णालयातील आवश्यक सुविधांची पाहणी करत आणखी कशाची गरज आहे. याची माहिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.

मेडिकल कॅालेजसाठी स्वतंत्र इमारतीची गरज असून त्याची उभारणी करण्यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, मेडीकल कॅालेजचे नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. अविनाश टेकाडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंके, डॉ. समीर गोलावार, डॉ. अशोक गजभिये, डॉ. इंद्रजित नागदेवते हे प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हावासियांना जास्तीत जास्त चांगली आणि तज्ज्ञ डॅाक्टरांची सेवा मिळावी, त्यांना चंद्रपूर किंवा नागपूरला जाण्याची गरज पडू नये. यासाठी गडचिरोलीचे वैद्यकीय महाविद्यालय लवकर सुरू करण्यासंदर्भात सकारात्मक प्रस्ताव शासनाकडे सादर करा, अशी सूचना यावेळी खासदार नेते यांनी अधिष्ठाता डॉ. टेकाडे यांना केल्या. यावेळी त्यांनी रुग्णालयातील विविध विभागांनाही भेटी दिल्या.

Latest Posts

Don't Miss