Latest Posts

सरकारची जीएसटीतून २०.१८ लाख कोटी कमाई : मार्चमध्ये मिळाले १.७८ लाख कोटी रुपये

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (Navi Delhi) : देशांतर्गत विक्रीत वाढ झाल्याने मार्च महिन्यात (जीएसटी) संकलन ११.५ टक्क्यांनी वाढून १.७८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. संपूर्ण आर्थिक वर्षात (एप्रिल २०२३-मार्च २०२४) एकूण जीएसटी संकलन २०.१८ लाख कोटी रुपये झाले असून, हे करसंकलन गेल्या वर्षाच्या तुलनेत ११.७ टक्क्यांनी अधिक आहे.

हा एक मैलाचा दगड असल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. मार्च २०२४ मध्ये जीएसटी महसूल वार्षिक ११.५ टक्क्यांनी वाढून १.७८ लाख कोटी रुपयांच्या दुसऱ्या सर्वोच्च पातळीवर आहे.

सर्वाधिक वाटा कोणाचा ?
राज्य मार्च २०२४ वाढ
महाराष्ट्र २७,६८८ कोटी २२%
कर्नाटक १३,०१४ कोटी २६%
गुजरात ११,३९२ कोटी १५%
तामिळनाडू ११,०१७ कोटी १९%
यांचा वाटा घसरला
राज्य झालेली घट
मिझोराम -२९%
इतर प्रदेश -२१%
लक्षद्वीप -१८%
अंदमान निकोबार -१४%

Latest Posts

Don't Miss