Latest Posts

एटापल्ली तालुक्यात सार्वत्रिक निवडणुकीत एकुण सहा पैकी तिन ग्रामपंचायत अविरोध निवड ग्रामसभेचे वर्चस्व

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली (Etapalli) : तालुक्यातील सर्वत्रिक निवडणूक एकूण ६ पैकी ३ ग्रामपंचायत अविरोध निवडून आल्या असून यामध्ये ग्रामसभाचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. महाग्रामसभा तालुका अध्यक्ष नंदू मट्टामी यांच्या मार्गदर्शनात सुधाकर गोटा वेनहरा इलाका प्रज्वल नागुलवार यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत सेवारी ग्रामपंचायत जेवेली(बु)ग्रामपंचायत चोखेवाडा, या तिनंही ग्रामपंचायतीवर ग्रामसभेचे अविरोध एक हाती सत्ता काबीज केली.

ग्रामसभा वेनहारा इलाका सचिव राजू गोमटी, नैनु लेकामी, रामजी हिचामी, लंकेश गोटा, सैनू मट्टामी, सुधाकर गोटा, सुरेश मट्टामी, सुनील मडावी, कमल हेडो, बेबि हेडो, हरिदास मट्टामी, शामादादा नैताम सह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

या तीन ग्रामपंचायतवर निवडून आलेले ग्रामपंचायत जेवली (बू)सरपंच म्हणून निवडून कु.अलीशा गोटामी, सदस्य नेवसू नरोटे, संगीता हीचामी, अनिता तोफा, सुमित्रा हिचामी, दामाजी हिचामी, ग्रामपंचायत चोखेवाडा सरपंच पदाकरीता निवडूण आलेले लालसू नरोटी, सदस्य करिता मनोज नरोटी, रीना नैताम, सुरेखा परसा, हरिदास मट्टामी, मिना उसेंडी, शशिकला पडको, ध्यांनेश्वर उसेंडी, ग्रामपंचायत शेवारी सरपंच पदाकरीता-वनिता गोटा, पल्लवी डोंगरे, रिना गावडे, नकुल गुरनुले, सुषमा गोमदी, पुष्पा चटारे, बाबूराव पुंगाटी, लींगु उसेंडी, इत्यादी उमेदवार निवडूण आले.

Latest Posts

Don't Miss