Latest Posts

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत युनियन शाखा बल्लारपूर तालुक्याच्या वतीने प्रलंबीत मागण्या सोडविण्यांसाठी येत्या १८, १९, २० डिसेंबर दरम्यान राज्यभर कामबंद आंदोलन करीत आहे.

यामुळे राज्यभरातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पाठींबा देण्याकरीता बल्लारपूर तालुक्यातील १७ ग्रामपंचायतमध्ये तीन दिवस कामबंद आंदोलन केले आहेत.   बल्लारपूर तालुक्यात एकूण १७ ग्रामपंचायत आहेत. ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी कार्यरत आहेत. गावातील नागरिकांना दररोज ग्रामपंचायतमध्ये कामासाठी यावे लागते. अशातच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी तीन दिवस कामबंद आंदोलन राहणाऱ्यामुळे गावपातळीवरील नागरिकांचे आवश्यक कामे प्रभावित होणार आहे.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या शासनाकडे महत्वपूर्ण मागण्या प्रलंबीत आहेत. याकडे राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने न्याय मागण्या सोडविण्याकडे दुर्लक्ष केले आहे.

येथील पंचायत समिती समोर बल्लारपूर तालुका ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे अध्यक्ष संतोष निपुंगे, सचिव सागर आत्राम यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे. अजय निंबाळकर, गजानन मडावी, प्रवीण निखारे, मारोती गोरघाटे, अशोक ठुणेकर सह आदी कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत.

Latest Posts

Don't Miss