Latest Posts

अहेरीत संपन्न झाला शानदार कव्वाली मुकाबला : कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन

– माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांची प्रमुख उपस्थिती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : दसरा निमित्ताने अहेरी शहरात पहील्यांदाच शानदार कव्वाली मुकबल्याचा आयोजन करण्यात आला. त्याचे उदघाटन अन्न व औषध प्रशासन मंत्री राजे धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी युवा नेते ऋतुराज हलगेकर, माजी जि.प.अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

अहेरी शहरात दरवर्षी दसरा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. केवळ अहेरी उपविभागतील नागरिकच नाही तर जिल्ह्यातील विविध भागातून दसरा उत्सव पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित राहतात. या उत्सवाला यंदा कव्वालीच्या रूपाने अधिक मजेदार करण्यात आला. देश विदेशात प्रसिद्ध असलेले जुनेद सुलतानी दिल्ली व झारा डिस्को दिल्ली यांनी कव्वाली मुकाबल्यातून उपस्थित जनतेला मंत्रमुग्ध केले.

२० ऑक्टोबर रोजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या वाढदिवसानिमित्त हास्यकल्लोड व नृत्यांचा नजराणा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यांनतर दुर्गा उत्सव व दसरा निमित्ताने अहेरीत जनतेची उपस्थिती बघून माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी शानदार कव्वाली मुकबल्याचा आयोजन केले. जवळपास मागील २० ऑक्टोबर ला अहेरी शहरात विविध कार्यक्रम घेण्यात येत असून अहेरीत येणाऱ्या नागरिकांचे चांगलेच मनोरंजन झाले हे विशेष.

कव्वाली मुकाबला सुरू होताच मंत्री धर्मराव बाबा आत्राम, युवानेते ऋतुराज हलगेकर माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी उपस्थित राहून कव्वालीचा आस्वाद घेतला. तर गांधी चौकात प्रेक्षकांनी सुद्धा एकच गर्दी केली होती. एकंदरीत दसरा उत्सवात उपस्थित जनतेला चांगलाच मनोरंजन झाला.

Latest Posts

Don't Miss