Latest Posts

पालकत्व घेणाऱ्यांचे नाव व मतिमंद पाल्यांच्या नावांवर ११ सप्टेंबरपर्यंत आक्षेप व तक्रारी नोंदविता येणार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : पालकत्व घेणाऱ्यांचे नाव व मतिमंद पाल्यांच्या नावांची यादी यांच्या परिवारातील आप्तस्वकीय, परकीय नातेवाईकांचे वाद किंवा तक्रारींचे आक्षेप असल्यास या हरकती ११ सप्टेंबरपर्यंत dswozpnagpur@gmail.com  या ईमेल वर नोंदविता येणार आहेत.

संबंधितांनी याबाबत तक्रार असल्यास जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद नागपूर या पत्त्यावर पाठविण्यात यावी. त्यानंतरच्या मुदतबाह्य तारखेत तक्रारीचे आक्षेप प्राप्त झाल्यास व समितीने पालकत्व मंजुरी दिल्यानंतर अशा वाद असलेल्या तक्रारीचे आक्षेप ग्राह्य धरण्यात येणार नाही, याची नोंद आक्षेपकर्त्यांनी घ्यावी.

राष्ट्रीय विश्वस्त अधिनियम १९९९ अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना कायदेशीर पालकत्वासाठी स्थानिक स्तर समितीपुढे पालकांचे प्राप्त अर्ज जाहीर प्रकटनाद्वारे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागात उपलब्ध करून देण्यात आल्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss