Latest Posts

हायस्पीड एक्सप्रेस रस्त्यांवर अवजड प्रवासी वाहनांसाठी मार्गदर्शक सूचना जारी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : प्रवासी, चालक, मालक आणि इतर रस्ते वापरकर्त्यांची सुरक्षा वाढविण्यासाठी हायस्पीड एक्सप्रेस रस्त्यांवर जड प्रवासी वाहनांसाठी मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहे. या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

वाहन चालकांनी प्रवास सुरु करण्यापुर्वी प्रवाशांना माईक स्पीकर प्रणालीद्वारे आणिबाणीच्यावेळेस बाहेर पडण्याचे ठिकाण आणि त्याचा वापर याबद्दल माहिती दिली पाहिजे. सुरक्षितता माहिती, आपत्कालीन निर्गमन स्थान, अग्नीशामक यंत्र स्थान, प्रत्येक प्रवाशासमोर छापलेल्या कार्डमध्ये उपलब्ध करुन दिले पाहिजे. सर्व संबंधित रहदारी कायदे आणि नियमांचे पालन करावे. संपूर्ण प्रवासात प्रवाशांच्या सुरक्षिततेची आणि सोईची खात्री करावी.

मार्गदर्शक सुचनेनुसार प्रतितास ८० किमी व स्कुल बससाठी प्रतितास ४० किमी वेग मर्यादा ठेवावी. वाहन योग्य स्थितीत ठेवणे आवश्यक आहे.स्थापित प्रोटोकॉलनुसार  आणिबाणीच्या परिस्थितीत ८१८१८१८१५५ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. कोणत्याही अडथळ्याशिवाय आणीबाणीतून बाहेर पडण्याची व्यवस्था योग्य प्रकारे केली जात असल्याची खात्री करावी. बसच्या टपावर कोणताही माल नेऊ नये, व लगेज होल्डमध्ये कोणताही व्यावसायिक माल नेऊ नये, याची चालकाने काटेकोरपणे काळजी घ्यावी.

बसमध्ये डोळे दिपवणारी दिवे व कर्कश हॉर्न नियमानुसार मनाई आहे. कोणत्याही प्रकारचे नशापान करुन वाहन चालविणे दंडनिय गुन्हा आहे. ज्वलनशिल मालाची वाहतुक प्रवासी वाहनात करण्यास मनाई आहे.

वाहन चालक व मालकांनी रस्त्यांची योग्यता सुनिश्चित करण्यासाठी वाहनांची नियमित तपासणी आणि देखभाल केली जाते, याची खात्री करावी. वाहनांची वैध योग्यता प्रमाणपत्र असल्याची खात्री करावी. आपत्कालीन परिस्थितीत चालकांना आवश्यक प्रशिक्षण आणि संसाधने प्रदान करावी. वाहन देखभाल आणि तपासणीच्या नोंदी ठेवण्यात याव्या.

लांब पल्ल्याच्या प्रवासात थकवा टाळण्यासाठी ड्रायव्हरच्या ड्यूटीच्या नोंदी ठेवाव्या. वाहन चालकांनी एक्सप्रेसवेवर नेमून दिलेल्या वेग मर्यादांचे नेहमी पालन करणे आवश्यक आहे. प्रतिकूल हवामानात किंवा जड रहदारीच्या वेळी चालकांनी त्यांचा वेग कमी करावा आणि सुरक्षित अंतर राखावे. स्थानिक नियमांनुसार जड प्रवासी वाहनांसाठी निर्दिष्ट वेग मर्यादा ओलांडू नये. प्रवासी वाहनांनी नमून दिलेल्या मार्गीकेचे पालन करावे.

वाहनाची नियमित देखभाल आणि तपासणी तसेच चालकांनी प्रत्येक प्रवासापूर्वी वाहनाची तपासणी करणे आवश्यक आहे.

वाहनाच्या दोषाची तक्रार मालकाला करणे आवश्यक आहे. प्रवाश्यांच्या सुरक्षिततेसाठी वाहन चालू असतांना प्रवाशांना उभे राहण्यास किंवा आत जाण्यास मनाई करावे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक दंडनीय अपराध आहे. चालकाच्या केबिनमध्ये किंवा चालकाच्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी नाही. वाहन चालकांनी मोबाईल फोन वापरु नये. वाहन चालवितांना खाणे, पिणे किंवा इतर कोणतेही लक्ष विचलित करणे टाळावे. चालकाचा थकवा टाळण्यासाठी लांबचा प्रवास सुरु करण्यापुर्वी पुरेशी विश्रांती घेतली पाहिजे. वाहन चालवितांना डावीकडील मार्गिकेचा उपयोग करावा. सुरक्षित अंतर राखावे अपघात प्रवणस्थापासुन सावध राहावे.

वाहनचालकांनी कोणत्याही अपघाताची जवळची चुकलेली किंवा सुरक्षेच्या उल्लंघनाची तक्रार वाहन चालक, मालक आणि संबंधित अधिका-यांना त्वरीत करणे आवश्यक आहे. यासाठी महाराष्ट्र समृध्दी महामार्गाच्या १८००२३३२२३३ या टोल फ्री क्रमांकावर किंवा ८१८१८१८१५५ या दुरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदवावी. समृध्दी महामार्गावर वाहन थांबविल्यास व पार्किग करण्यास सक्त मनाई आहे.

राज्य शासनाच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे त्या त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडेदर विचारात घेऊन खाजगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी  संपुर्ण बससाठी येणा-या प्रति कि.मी. भाडेदराच्या ५० टक्केपक्षा अधिक राहणार नाही, असे कमाल भाडे दर निश्चित केले आहे.

त्यामुळे खाजगी बस वाहनधारकांनी जादा भाडेदर घेतल्यास मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार बस धारकांवर कार्यवाही करण्यात यईल. तसेच प्रवाशांकडुन जादा भाडेदर आकारल्यास व प्रवास करतांना येणा-या अडचणी बाबत काही तक्रार असल्यास उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ०७१५२ ५४३२४३ या दुरध्वनी क्रमांकावर किंवा mh32@mahatranscom.in या ईमेलवर तक्रार सादर करावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी मो.समीर मो.याकुब यांनी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss