Latest Posts

चंद्रपूर जिल्ह्यात गारठा वाढणार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : राज्यात सर्वत्र गारठा जाणवत असून विदर्भातील तापमानात मोठी घसरण होत आहे. हवामान विभागानुसार पुढील काही दिवस थंडीचा कडाका राज्यातील अनेक भागांत जाणवणार आहे. उत्तर भारतात थंडीचा कहर सुरु असून पर्वतांवर बर्फवृष्टी होत आहे. परिणामी उत्तरेकडून थंड वारे वाहू लागले असून विदर्भातील ११ जिल्ह्यामध्ये थंडी वाढली आहे. दिवसाच्या थंडीबरोबर रात्रीच्याही थंडीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात चांगलीच थंडी पडत आहे. जिल्ह्यात अंशतः ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज आहे. सोमवारी गोंदिया आणि यवतमाळ चे ९ अंश सेल्सियस तर चंद्रपूर चे तापमान ११.० अंश सेल्सियस नोंदवले गेले. नागपूर ९.४, अकोला १३.५, अमरावती १२.५, बुलढाणा १२.८, ब्रम्हपुरी ११.४, गडचिरोली १०.६, वर्धा ११.४, वाशिम १०.० अंश सेल्सियस होते. यामुळे सध्या उर्वरित महाराष्ट्रापेक्षा विदर्भात थंडी जास्त असल्याचे दिसून येत आहे. पुढील आठवडा राज्यात सर्वत्र हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला.
डोंगराळ राज्यांमध्ये बर्फवृष्टीमुळे मैदानी भागात कडाक्याची थंडी पडत आहे. उत्तर भारतातील सर्व राज्यांमध्ये तापमानात घट झाल्याने थंडी वाढली आहे.

Latest Posts

Don't Miss