Latest Posts

हनुमान वार्ड प्रभाग क्र. ९ येथे ३० लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या विशेष प्रयत्नातून गडचिरोली शहरामधील हनुमान वार्ड प्रभाग क्र. ९ मध्ये ३० लक्ष रुपयांचे सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार देवराव होळी यांचे हस्ते तर लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

याप्रसंगी शहर महामंत्री केशव निंबोड, विनोद देवोजवार, नरेश हजारे, देवाजी लाटकर, प्राध्या. उराडे, सुनीता काटवे, विजय शेडमाके, विलास नैताम यांचे सह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss