Latest Posts

कठोर परिश्रमाने यश मिळवा : जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

– नवोदय येथे जिल्हाधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय, पाचगाव जिल्हा भंडारा येथे विद्यालय व्यवस्थापन समिती (VMC) आणि विद्यालय सल्लागार समिती (VAC) ची बैठक नुकतीच झाली.

या बैठकीचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी भूषवले. या बैठकीला गोंदिया आणि भंडारा मतदारसंघाचे खासदार (लोकसभा) प्रशांत पडोळे, जिल्हा परिषद भंडाराचे अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, नवोदय समितीचे सचिव आणि जवाहर नवोदय विद्यालय, पाचगाव, भंडारा चे प्राचार्य एम.एस. बलवीर हे उपस्थित होते. शिक्षण अधिकारी श्री. रविंद्र सलामे, रविंद्र चकोले, डॉ. अंबेकर, श्रीमती केसर बोकाडे, यामिनी देशमुख आणि संजय समृत आणि विद्यालयाचे
राजेश येलणे व विजय निनावे यांनी सहभाग घेतला. या बैठकीचे परिचय आणि सूत्रसंचालन सुधाकर यांनी केले.

सर्व मान्यवरांचे भारतीय परंपरेनुसार विद्यालयाचे प्राचार्य यांनी स्वागत केले, त्यांना सन्मान म्हणून लेझीम पथकाने नृत्य सादर केले आणि स्काउट गटाने परेड केली.

शाळेत ही बैठक आयोजित करण्यात आली होती आणि विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. शाळेच्या यशांची माहिती या बैठकीत सादर करण्यात आली. आणि सर्व अधिकाऱ्यांनी शाळेतील शैक्षणिक आणि सह-शैक्षणिक उपक्रमातील गौरव आणि वैभव याबद्दल माहिती मिळवली. विद्यालयातील समस्या ही जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष मांडण्यात आल्या आणि त्यांनी शक्य तितक्या उपाययोजनांची खात्री दिली. जिल्हाधिकारी कुंभेजकर विद्यालयाला त्वरित मदत करण्याचे निर्देश दिले. अध्यक्ष आणि अधिकाऱ्यांनी विद्यालयाच्या विविध विभागांना भेट दिली आणि विभागांच्या कार्यक्षमतेची चौकशी केली.

सर्वांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना संबोधित करताना अध्यक्षांनी विद्यालयाच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनातील यशाबद्दल प्रेरित केले. गोंदिया-भंडारा मतदारसंघाचे खासदार प्रशांत पडोळे यांनी विद्यार्थ्यांना विश्वासात घेतले, जीवनातील चांगले अनुभव आणि महान व्यक्तींच्या जीवनातील काही प्रसंग सांगून प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांना समाज आणि देशाबद्दलच्या त्यांच्या भूमिका, जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये याबद्दलही जागरूक केले.

शेवटी, आपल्या देशाच्या संस्कृतीची झलक दाखवण्यासाठी विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने कार्यक्रम आयोजित केला होता आणि सर्व मान्यवरांनी उपस्थित राहून नवोदय विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले.

इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांनी गोंधळ नृत्य सादर केले, ज्यामध्ये लावणी, आदिवासी लोकनृत्य आणि गायनाचे सादरीकरण होते. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुजल जांभुळकर आणि  स्वधा लांजेवार यांनी केले.

Latest Posts

Don't Miss