Latest Posts

हरे कृष्ण पूजा व महानाम यज्ञ कार्यक्रमाला माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांची उपस्थिती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / मुलचेरा (Mulchera) : तालुक्यातील शांतीग्राम येथे १६ ते १८ फेब्रुवारी पर्यंत हरे कृष्ण पूजा व महानाम यज्ञ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य अमित मुजुमदार, सपन डे, लगाम चे सरपंच दिपक मडावी, उपसरपंच मधुकर गेडाम, हरे कृष्ण पूजा कमिटीचे अध्यक्ष सुजय मंडल, गोविंद विश्वास, सुशील खराती, विरांशू विश्वास, विकास घरामी, सनत मंडल, सुशांत बेपारी, आनंद रॉय, शंतिग्राम येथील ज्येष्ठ नागरिक तथा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरवर्षी शांतीग्राम येथे हरे कृष्ण पुजा आणि महानामयज्ञ कार्यक्रम घेतले जाते. यंदा १६ ते १८ फेब्रुवारी पर्यंत ही पूजा केली जात आहे. १६ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घट स्थापना करण्यात आली. महणाम कीर्तन आणि आज याठिकाणी महाप्रसाद वितरण केले जाणार आहे. झालेल्या महणाम कीर्तन कार्यक्रमाला भाग्यश्री आत्राम यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. स्थानिक बंगाली बांधवांनी मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम साजरा केला होता. भाग्यश्री आत्राम यांचे आगमन होताच कमिटी तर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात महिलांनी व युवतींनी यावेळी विविध धार्मिक नृत्य सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. यावेळी भाग्यश्री आत्राम यांच्याकडून बक्षीस देण्यात आले. तर हरेकृष्ण आणि महानाम यज्ञ कमिटीला भाग्यश्री आत्राम यांनी आर्थिक मदतही केले.

या दोन दिवसीय हरेकृष्ण महानाम यज्ञ कार्यक्रमात भजन कीर्तन सांस्कृतिक कार्यक्रम तसेच महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी लगाम, शांतिग्राम, दामपूर, येला, परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss