Latest Posts

आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे रामपुर (कढोली) गावात डेंग्यू आजाराची साथ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / आष्टी (Ashti) : चामोर्शी तालुक्यातील कढोली ग्रामपंचायत मधील रामपुर या गावात मागील पाच दिवसांपासून डेंग्यू आजाराची साथ आहे. या गावात प्रत्येक दिवशी दोन- तीन नागरीक डेंग्यू आजारानी रुग्णालयात दाखल होत आहेत. आता पर्यंत १२ जण डेंग्यू आजारानी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

त्यातील ९ रुग्ण – १) वर्धा डोंगरे, २) कमला डोंगरे, ३) लैजा चांदेकर, ४) भाऊजी चांदेकर, ५) मोनू चांदेकर ६) जयंत चांदेकर, ७) ज्योती चांदेकर, ८) आरोही दुर्गे, ९) मारोती खोब्रागडे हे ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे तर ३ रूग्ण १) उमेश डोंगरे, २) आनंदराव डोंगरे, ३) निर्मला डोंगरे हे जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे आयसीयु मध्ये उपचार घेत आहेत.

डेंग्यूची साथ पसरली असतानाही मात्र आरोग्य विभागाचे अजूनही याकडे दुर्लक्षित होत असल्याने दिसून येत आहे. तसेच नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला आहे. तरी आरोग्य प्रशासनाने या परिस्थितीत कडे दुर्लक्ष केला जात आहे. तरी या गंभीर रोगाकडे लक्ष केंद्रित करून गावातील प्रत्येक नागरीकांची डेंग्यू चाचणी घ्यावी, अशी ग्रामपंचायत सदस्य कृष्णा वाघाडे यांची मागणी आहे.

Latest Posts

Don't Miss