Latest Posts

उष्णतेच्या लाटांना सुरुवात : पुढील पाच दिवसात या भागात येणार लाट

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : हवामान विभागाने नुकत्याच दिलेल्या अंदाजानुसार देशभरात येत्या दोन महिन्यात उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे. त्यानुसार काल जाहिर करण्यात आलेल्या हवामान अहवालानुसार पुढील पाच दिवसात कर्नाटक, ओडिशाच्या काही भागांपासून उष्णतेच्या लाटांना सुरुवात होणार असून आंध्र प्रदेशातही उष्ण तापमानाची लाट असेल.

दरम्यान, राज्यात तापमानाचा पारा ४० ते ४३ अंशांपर्यंत जात असताना बहुतांश टिकाणी सामान्य तापमानाच्या तूलनेत १ ते ४ अंशांनी तापमान वाढले आहे. काल राज्यात सर्वाधिक ४२.७ अंश सेल्सियस तापमान वर्ध्यात नोंदवले गेले. हवामान विभागाने नुकत्याच दिलेल्या हवामान अंदाजानुसार देशभरात पुढील दोन महिने उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसात कर्नाटक व ओडिशाच्या काही भागात उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे.

दरम्यान काल कमाल तापमानात देशभरात सर्वाधिक वाढ झाल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. यावेळी उत्तर ओडिशासह मराठवाडा, विदर्भासह कर्नाटक, मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी ३ एप्रिल रोजी तापमान नेहमीपेक्षा ९५ टक्के अधिक होते. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा विदर्भ व कोकणात काल तापमान सामान्या तापमानाच्या तूलनेत अधिक असल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले.

Latest Posts

Don't Miss