Latest Posts

सुर्यापल्ली येथे आयोजित क्रिकेट सामन्यांचे बक्षीस वितरण संपन्न

– माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या तर्फे देण्यात आले होते प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक
– माजी सभापती भास्कर तलांडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : तालुक्यातील राजाराम अंतर्गत येत असलेल्या सूर्यापाल्ली येथील जय रावण व्हाॅलीबाॅल क्लब तर्फे भव्य ग्रामीण व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी पहिला- दुसरा- तिसरा असे तीन पुरस्कार ठेवण्यात आली आहे. आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्यातर्फे विजय संघानां अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आली आहे.

यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, राजाराम ग्रामपंचायतचे उपसरपंच रोशन कंबगोनीवार, मारपाल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, संजीव पोरतेटसह परिसरातील आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss