Latest Posts

सीमांकन तयार करून स्वतः बांबू तोड करण्याकरिता मदत द्या : उपवनसंरक्षकांना काँग्रेस तर्फे निवेदन 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड (Bhamragad) : वन विभाग भामरागड स्थित आलापल्ली येथे काँग्रेस तर्फे ग्रामसभा पोयरकोटी द्वारे आराखडा तथा सीमांकान तयार करून २०२३-२४ चालू वर्षा करीता सामूहिक अंतर्गत खंड क्र ६७५ मधील बांबूची स्वतः तोड करण्याकरिता तांत्रिक मदत करण्याबाबत निवेदन देण्यात आले.

 

सदर निवेदन ग्रामसभा पोयरकोठी यांनी सुक्ष्म आराखडा वा सिमांकन तयार करून आपल्या कार्यक्षेत्रातील नियतक्षेत्र पोयरकोठी येथील क्षेत्र सहाय्यक वनरक्षक कार्यरत असलेल्या त्यांचा मदतीने सूक्ष्म आराखडा व सीमांकन तयार करून ग्रामसभाद्वारे सामुहीक वनहक्क अंतर्गत सन २०२३-२४ वर्षाकरीता शासनाच्या कार्यालयाकडे जतननुसार बांबु तोडस उपलब्ध असलेली खंड क्र ६७५,६६७ चे तुंरत सिमांकन शॅम्पल प्लॉट ची कार्यवाही त्वरीत पुर्ण करून बांबू तोडण्याची परवानगी देण्यात यावी, करिता गावकऱ्यांनी उपवनसंरक्षकांना निवेदन दिले.

 

 

यावेळी निवेदन देतांना माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार, आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी, सुक्रम मडावी, अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, मारपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम सह समस्त गावकरी उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss