Latest Posts

मुंबईत हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा : १२ महिलांसह ४५ जणांना अटक

– 35 लाखांची रोकड जप्त
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : मुंबईतील खार पश्चिम भागातील ओम पॅलेस या उच्चभ्रू सोसायटीमध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर शनिवारी मध्यरात्री मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा यूनिट-9 ने छापा टाकला. या छापेमारीदरम्यान 45 जणांना अटक करण्यात आली.

यात 12 महिलांचा आणि 33 पुरुषांचा समावेश आहे. तसेच 35 लाखांची रोकड आणि एक कोटी रुपयांचे इतर सामान पोलिसांनी जप्त केले आहे.

खार पश्चिम येथील आंबेडकर रोडवर असणाऱ्या ओम पॅलेस या सोसाटीमध्ये अवैध जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. इमारतीच्या पाचव्या मजल्यावर असणाऱ्या फ्लॅटमध्ये हा प्रकार सुरू होता. याची माहिती मिळताच शनिवारी मध्यरात्री एक वाजता दया नायक यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेने छापा टाकला. यावेळी फ्लॅटमध्ये अनेक महिलांसह पुरुष जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले.

गुन्हे शाखेचे पथक येथे पोहोचले असता त्यांना फ्लॅटमध्ये थ्री-कार्ड रमी, पोकर यासारखे खेळ सुरू असल्याचे दिसले. मोठमोठी रक्कम लावून हा जुगार खेळला जात होता. हा जुगाराचा अड्डा चार भागिदारांमध्ये चालवला जात होता आणि तीन वेगवेगळ्या टेबलवर जुगार सुरू होता. जुगार खेळणे सुकर व्हावे म्हणून ग्राहकांना विविध रंगांची आणि किंमतींची प्लॅस्टिकची नाणी देण्यात आली होती. तसेच ग्राहकांच्या सोयीसाठी 3 जॉकीही ठेवण्यात आले होते.

फ्लॅटचा मालक समीर आनंद पोलिसांच्या वॉन्टेड श्रेणीत असून त्याच्यासह जॉकी आणि ग्राहकांना पोलिसांनी अटक केली आहे. समीरच्या ताब्यातून 50 हजार रुपये पोलिसांनी जप्त केले. यासह जुगार खेळणाऱ्यांकडून 35 लाख रुपये रोख आणि 1 कोटी 1 लाख 50 हजार किंमतीची जुगाराची नाणी पोलिसांनी जप्त केली आहे.

दरम्यान, गुन्हे शाखा यूनिट-9 चे प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. मालकाच्या संमतीशिवाय त्याच्या फ्लॅटमध्ये एवढा मोठा जुगार अड्डा चालवणे अशक्य आहे. गेल्या काही काळापासून येथे जुगार सुरू असून यात कोणत्याही सेलिब्रिटी किंवा व्हीआयपी व्यक्तीचा समावेश नव्हता, असे दया नायक यांनी सांगितले. फ्री प्रेस ने याबाबत वृत्त दिले आहे.

Latest Posts

Don't Miss