Latest Posts

घुग्गुस येथील शेकडो युवकांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश

– मनसे जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराला प्रेरित होऊन घुग्गुस येथे शेकडो युवकांनी मनसे जिल्हाध्यक्ष मनसे मनदिप रोडे नेतृत्वात पक्षात प्रवेश केला.

सध्या महाराष्ट्र मधील घाणेरडे राजकारण पाहून व महागाई, बेरोजगारी कडे सर्व पक्षांच दुर्लक्ष आहे. केवळ रोजगाराचे गाजर दाखवून आशेवर ताटकळत ठेवले जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मनसे  जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे यांनी बेरोजगारांच्या हिता करिता अनेकदा तसेच वारंवार लढत असतात आंदोलन केले. याचा फायदा बेरोजगारांना झाला. यामुळे बेरोजगारांच्या अपेक्षा वाढल्या आहे. आता मनसेच काही तरी करू शकतात यामुळे जिल्ह्यातील युवक, सुशिक्षित बेरोजगार‌ मनसे जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मनसे कडे आकर्षित झाले आहे.

यावेळी युवकांना मार्गदर्शन करताना मनसे जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे म्हणाले की, मनसेने स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी यशस्वी संघर्ष केला आहे. यापुढेही स्थानिकांना रोजगारासाठी उद्योग कंपन्यां विरोधात आंदोलन करीत राहणार आहे. निवडणूक आचार संहिता संपताच बेरोजगारांना घेऊन मोठे आंदोलन छेडण्याचे आश्वासन दिले. यावेळी मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss