Latest Posts

एलॉन मस्कची मोठी घोषणा : आता X वापरायचं असेल तर सर्वांना द्यावे लागणार पैसे

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : X वर लवकरच नवीन अकाऊंट तयार करण्यासाठी चार्ज द्यावा लागणार आहे. एलॉन मस्क यांनी लाईव्ह स्ट्रीमिंग दरम्यान याबाबत माहिती दिली. ते सर्व युजर्ससाठी पेड प्लॅटफॉर्म बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत असं मस्क यांनी म्हटलं आहे.

एक्सने सांगितलं की, ते दोन देशांमध्ये नवीन प्रोग्रामची चाचणी घेत आहेत. ‘Not a Bot’ असं या प्रोग्रामचं नाव आहे.

हा प्रोग्राम सुरुवातीला न्यूझीलंड आणि फिलिपाइन्स या दोन देशांमध्ये सुरू करण्यात आला आहे. या देशांमध्ये, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर नवीन अकाऊंट तयार करणाऱ्या युजर्सना 1 डॉलर फी भरावी लागते. ही फी इतर युजर्सशी संवाद साधण्यासाठी आकारली जाते. नेमकं काय आहे हे जाणून घेऊया.

मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन : 
Not a Bot प्रोग्राम अंतर्गत, युजर्सना त्यांच्या मोबाईल नंबरचं व्हेरिफिकेश करावं लागेल. हा नियम सर्व नवीन युजर्सना देखील लागू होतो. युजर्सने फोन नंबरची व्हेरिफाय केल्यावर, त्याला सब्सक्रिप्शन प्लॅन निवडावा लागेल. यासाठी, युजर्सकडे तीन पर्याय आहेत – 1 डॉलर प्लॅ, X प्रीमियम आणि व्हेरिफाइड ऑर्गेनाइजेशन.

1 डॉलरच्या प्लॅनमध्ये तुम्हाला काय मिळेल?
या तीन प्लॅनमध्ये हा सर्वात स्वस्त पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला X वर अनेक फीचर्सचा एक्सेस मिळतो, जे पूर्वी मोफत असायचा. कंपनी कमेंट पोस्ट करण्याची, पोस्ट लाईक करण्याची, पोस्टवर रिप्लाय करण्याची, कोट किंवा पोस्ट रिपोस्ट करण्याची आणि पोस्ट बुकमार्क करण्याची सुविधा देते. हे फीचर्स आता सर्व युजर्ससाठी फ्री आहेत.

नवीन युजर्स फ्रीमध्ये अकाऊंट क्रिएट करू शकतात का?
नवीन युजर्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक नवीन अकाऊंट फ्रीमध्ये तयार करू शकतात, परंतु त्यांना मर्यादित एक्सेस मिळेल. असे युजर्स केवळ इतर युजर्सच्या पोस्ट वाचू शकतात, व्हिडीओ पाहू शकतात आणि युजर्सना फॉलो करू शकतात. आता त्याचा सध्याच्या युजर्सवर काही परिणाम होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कंपनीचे म्हणणे आहे की, चाचणी दरम्यान, युजर्सवर कोणताही परिणाम होणार नाही आणि त्यांना कोणतीही सब्सक्रिप्शन फी द्यावी लागणार नाही. पण ‘चाचणी दरम्यान’ या पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे, ही सेवा सर्व युजर्ससाठी लागू केली तर त्यांना चार्ज द्यावे लागेल असं दिसतं.

Latest Posts

Don't Miss