Latest Posts

अवैधपणे दारू विक्री करणाऱ्या आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावास व २७ हजार रु. द्रव्य दंडाची शिक्षा

– चामोर्शी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एन.डी. मेश्राम यांचा न्यायनिर्णय
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : २३ ऑक्टोबर २०२० रोजी तापस दिनेश मल्लीक रा. नवग्राम तह. चामोशी जि. गडचिरोली हा आपल्या राहते घरी हात भट्टी मोह फुलाची दारु विक्री करीत आहे. अशा गोपनिय माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रभारी अधिकारी पोस्टे चामोर्शी यांच्या मार्गदर्शनाखाली चामोर्शी पोलीस पथकाने आरोपी यांचे घराची झडती घेतली असता, घराच्या स्वयंपाक खोलीमध्ये अवैध रित्या दहा लिटर मोह फुलांची दारु मिळून आल्याने आरोपी विरुद्ध पोस्ट चामोशी येथे अप क्र. ५८९/२०२० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

अधिक तपासाअंती आरोपी विरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने आरोपी विरुद्ध प्रभारी अधिकारी पोस्टे चामोशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोहवा/आर.डी. पिल्लेवान यांनी आरोपीविरुद्ध कलम ६५ (ई) महाराष्ट्र दारु बंदी अधिनियम अन्वये दोषारोपपत्र तयार करुन न्यायालयात दाखल केले.

फिर्यादी व इतर साक्षीदारांची साक्ष तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने ऐकल्यानंतर ०५ एप्रिल २०२४ रोजी आरोपी तापस दिनेश मल्लीक याला तीन वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रु. द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता म्हणून एस.एम. सलामे यांनी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद केला. तसेच पोअं/४१८८ टी.आर. भोगाडे यांनी सरकार पक्षास कोर्ट पैरवी म्हणून मदत केली व कामकाज पाहिले.

Latest Posts

Don't Miss