Latest Posts

अवैधरित्या वाहतुक होणारी लाखोची देशी दारू जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : गडचिरोली जिल्हयामध्ये अवैधरित्या वाहतुक होणारी लाखोची देशी दारू जप्त केली असून दोन आरोपींना अटक केले.

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पथक १७ मे २०२४ रोजी सपोनि गदादे, पोउपनि भुरले व पोलीस स्टॉफ पोलीस स्टेशन, मुल परिसरात पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय बातमिदाराकडुन माहिती मिळाली की, एक महिंद्रा कंपनीची पिकअप चार चाकी वाहन क्रमांक एम. एच. ३३ टि. २०१४ मध्ये अवैधरित्या देशी दारूची पोस्टे मुल परिसरातील चिरोली ते सुशी मार्गाने गडचिरोली जिल्हयात वाहतुक करीत आहे.

महिनीनुसार, नाकाबंदी करून वाहनास ताब्यात घेवुन नमुद वाहनाची पंचा समक्ष झडती घेतली असता, वाहनामध्ये २५० नग खर्डाचे खोक्यात प्रत्येक खोक्यात १०० नग प्रमाणे एकुण २५ हजार नग देशी दारू राकेश संत्रा कंपनीच्या प्रत्येकी ९० एम.एल. ने सिलबंद भरलेल्या प्रत्येकी ३५ रू. प्रमाणे एकूण किमंत ८ लाख ७५ हजार रूपयाचा माल तसेच गुन्हयात वापरलेली महिंद्रा कंपनीची पिकअप चार चाकी वाहन क्रमांक एम. एच. ३३ टि. २०१४ किमंत ७ लाख रुपये असा एकुण १५ लाख ७५ हजार रूपयाचा माल जप्त केला. तसेच आरोपी नामे करणसिंग ओमकारसिंग पटवा (२९) रा. गुरुव्दार जवळ मुल जिल्हा चंद्रपुर व मनोजकुमार जगदीश मुजुमदार (३९) रा. बंगाली कॅम्प, एटापल्ली, नि. गडचिरोली यांना वाहतुक करीत असतांना मिळालेल्या देशी दारू बाबत विचारणा केली असता, त्यांनी सदर देशी दारूचा माल अमोल रामदास ढोरे, रा. मुल, चंद्रपुर याचे मालकीचा मौजा चिरोली ता. मुल, जि. चंद्रपुर येथील देशी भट्टी मधुन चार चाकी वाहनामध्ये भरून दिल्याचे सांगितले आहे.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात सपोनि हर्षल एकरे, सपोनि पंकज बोनसे, सपोनि मनोज गदादे, पोउपनि विनोद भुरले, पोहवा जयंता चुनारकर, पोहवा किशारे वैरागडे, पोहवा रजनिकांत पुठ्‌ठावार, पोहवा सतिश अवथरे, नापोशि चेतन गज्जलवार, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.

Latest Posts

Don't Miss