Latest Posts

महत्त्वाची बातमी : १ ऑक्टोबरपासून हे नियम बदलणार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : सप्टेंबर महिना संपण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. पैशाशी संबंधित अनेक नियम १ ऑक्टोबरपासून बदलणार आहेत. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.
तुमच्यासाठी या नियमांची माहिती असणे महत्त्वाचे आहे. असे न झाल्यास तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

नोट बदलून घ्या –
रिझर्व्ह बँकेनं सप्टेंबर २०२३ पर्यंत २ हजार रुपयांची नोट बदलण्याची मुदत दिली आहे. त्यानंतर या नोटा चालणार नाहीत. त्यामुळे २ हजार रुपयांची नोट नक्कीच बदलून घ्या.

खाते होईल फ्रीज –
सेबीने डीमॅट आणि ट्रेडिंग खात्यांमध्ये नॉमिनेशन अनिवार्य केले आहे. त्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपेल. या तारखेपर्यंत कोणत्याही खातेदाराने नॉमिनेशन केले नाही तर ते खाते १ ऑक्टोबरपासून गोठवले जाईल. अशा परिस्थितीत तुम्ही डीमॅट आणि ट्रेडिंग करू शकणार नाही.

बचत खात्यासाठी आधार –
आता छोट्या बचत योजनांमध्ये आधार अनिवार्य करण्यात आले आहे. पीपीएफ, सुकन्या समृद्धी, पोस्ट ऑफिस स्कीम इत्यादींमध्ये आधारची माहिती देणे आवश्यक आहे. असे न केल्यास १ ऑक्टोबर २०२३ पासून ही खाती गोठवली जातील.

Latest Posts

Don't Miss