Latest Posts

२०२३ वर्षातील ३६५ दिवसातील चंद्रपूरच्या प्रदूषनाची आकडेवारी

– ३६५ पैकी ३३३ दिवस प्रदूषित तर ३२ दिवस आरोग्यासाठी चांगले
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाद्वारे दररोज २४ तास घेण्यात येणाऱ्या सतत हवा गुणवत्ता निरीक्षणाचा २०२३ ह्या मागील वर्षातील प्रदूषनाची आकडेवारी पाहता ३६५ दिवसात चंद्रपूर मध्ये केवळ ३२ दिवस प्रदूषण मुक्तीचे ठरले, १४१ दिवस कमी प्रदूषणाचे १५१ दिवस जास्त प्रदूषणाचे, ३६ दिवस आरोग्यासाठी हानिकारक तर ०५ दिवस धोकादायक प्रदूषण होते आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निरीक्षनाच्या आधारे ही धक्कादायक आकडेवारी येथील पर्यावरण अभ्यासक आणि ग्रीन प्लानेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा सुरेश चोपणे ह्यांनी दिली आहे.

चंद्रपूरचे किती दिवस चांगले आणि वाईट (AQI) –
चंद्रपूर च्या २०२३ वर्षातील ३६५ दिवसात ३३३ प्रदूषित आणि केवळ ३२ दिवस आरोग्यदायी श्रेणीत (Good AQI) आहेत १४१ दिवस हे साधारण प्रदूषणाचे श्रेणीत ( Satisfactory AQI ), १५१ दिवस हे माफक प्रदूषणाचे (Moderate) श्रेणीत, ३६ दिवस अतिशय प्रदूषित श्रेणीत ( Poor), तर ०५ दिवस हानिकारक प्रदूषणाचे श्रेणीत आले आहेत. शहरात धोकादायक श्रेणीतील प्रदूषण नोंदले गेले नाही. चंद्रपूर जिल्ह्यासोबतच, शहरात आणि ओउद्‌द्योगिक क्षेत्र खुटाळा येथे सतत वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्राद्वारे (CAAQMS) वायू प्रदूषणाची नोंद घेतल्या जाते. तिथे शहरापेक्षा जास्त प्रदूषण आढळते. प्रस्तुत आकडेवारी शहरातील बस स्थानक जवळ असलेल्या केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या केंद्रातील आहे. ही जरी शासकीय यंत्रणेद्वारे घेतलेली नोंद असली तरी अनेक ठिकाणी ह्यापेक्षाही जास्त प्रदूषण पाहायला मिळते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची प्रदूषणाची पुरेशी आकडेवारी उपलब्ध नाही परंतु जिल्ह्यातील ४ ओउद्द्योगिक क्षेत्रात घुग्गुस आणि राजुरा येथे जास्त प्रदूषण आहे.

पावसाळ्यातही प्रदूषण –
चंद्रपूर च्या मागील काही वर्षात पावसाळा हा साधारणता आरोग्यदायी मानला जात होता परंतु मागील २०२३ वर्षात पावसाळ्यात सुद्धा प्रदूषण आढळले. जून महिन्यात ३० पैकी २६ दिवस प्रदूषण आढळले, जुलै महिन्यात ३१ पैकी १८ दिवस प्रदूषण आढळले, ऑगस्ट महिन्यात ३१ दिवसापैकी २३ दिवस तर सप्टेंबर महिन्यात ३१ पैकी २८ दिवस साधारण ते माफक (Satisfactory to Moderate) प्रदूषण आढळले. पावसाळ्यातील एकूण ४ महिन्यातील १२२ दिवसापैकी ९५ दिवस प्रदूषण होते.

हिवाळा अतिशय प्रदूषित –
खरे तर हिवाळा हा ऋतू अतिशय आरोग्यदायी असतो परंतु अलीकडे सर्व शहरे ही प्रदूषित झाल्यामुळे हा ऋतू सुद्धा प्रदूषणामुळे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक ठरू लागला आहे. भौगोलिक दृष्ट्या संथ हवा आणि कमी तापमान हे जास्त प्रदूषणास कारणीभूत ठरतात. या ऋतूतील ऑक्टोबर महिन्यातील ३१ दिवसापैकी ३१ दिवस प्रदूषित, नोव्हेंबर महिन्यातील ३० दिवसापैकी ३० दिवस तसेच डिसेंबर महिन्यातील ३१ पैकी ३० दिवस अतिशय जास्त प्रदूषण होते.. जानेवारी २०२३ मध्ये एकूण ३१ दिवसापैकी ३१ दिवस प्रदूषण आढळले. हिव्वाळ्यातील एकूण १२३ दिवसापैकी १२२ दिवस प्रदूषण होते.

उन्हाळ्यातील सर्वच दिवस प्रदूषण –
उन्हाळ्यातील फेब्रुवारी, मार्च एप्रिल, मे या उन्हाळ्यातील महिण्यात सुद्धा प्रदूषण अधिक आढळले. या ऋतूतील फेब्रुवारी महिन्यातील २८ दिवसापैकी २८ दिवस प्रदूषण होते मार्च महिन्यात ३१ दिवसापैकी ३० दिवस प्रदूषण होते, एप्रिल महिन्यात ३० पैकी ३० दिवस प्रदूषण होते तर मे महिन्यात सुद्धा ३१ पैकी २८ दिवस प्रदूषण होते. म्हणजेच उन्हाळ्यातील एकूण १२० दिवसापैकी ११६ दिवस प्रदूषण होते.

वर्षात जास्त प्रदूषके कोणती आढळली –
वर्षातील ३६५ दिवसात सर्वाधिक १६३ दिवस हे सूक्ष्म धुलीकन १० मायक्रोमीटरची प्रदूषके होते तर १५९ दिवस सूक्ष्म धुलीकण २.५ ची होती. ३३ दिवस कार्बन मोनोक्साइड चे प्रदूषण तर १६ दिवस जमिनीवरील धोकादायक ओझोन वायूचे होते. ०१ दिवस नायट्रोजन ओक्साइड चे आढळले.

वायू प्रदूषण निर्देशांक (AQI) कसा काढतात –
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे देशातील प्रदूषित क्षेत्रात सतत हवा गुणवता मापन (CAAQMS) केले जाते, चंद्रपूर मध्ये बस स्थानक आणि खुटाळा येथे ही सुविधा उपलब्ध आहे. ह्यात सूक्ष्म धुलीकन, नायट्रोजन डाय ओक्साइड, सल्फर डाय ओक्साइड, कार्बनडाय ओक्साइड आनी ओझोन किंवा कमीत कमी मुख्य तीन प्रदूषके ह्याद्वारे AQI निर्देशांक तयार केला जातो. प्रत्येक प्रदुशकांची स्वतंत्र नोंद वेगळी असते परंतु AQI साठी सर्व प्रदूषके मिळून सरासरी काढल्या जाते.

चंद्रपूर मधील हवा गुनवत्ता निर्देशांक Air Quality Index
१) ०-५० निर्देशांक हा आरोग्यांसाठी (Good) उत्तम मानला जातो. हा आरोग्यासाठी चांगला निर्देशांक चंद्रपूर मध्ये केवळ ३२ दिवस आढळला.
२) ५१-१०० निर्देशांक हा (Satisfactory) समाधानकारक प्रदूषित मानला जातो परंतु त्यामुळे काही आधीच आजारी असलेल्या लोकांना त्रासदायक असतो . चंद्रपूर मध्ये हा साधारण प्रदूषित निर्देशांक १४१ दिवस होता.
३) १०१-२०० निर्देशांक हा (Moderate) माफक प्रदूषित मानल्या जात असून आणि हृदय, फुफ्फुसाच्या, दमा विकाराने ग्रस्त असलेल्या लोकाना, लहान मुले आणि वृद्ध लोकाना धोकादायक असतो. नागरिकांनी बाहेर व्यायाम करू नये, धावू नये अश्या सुचना दिल्या जातात. चंद्रपूर मध्ये हा प्रदूषिन निर्देशांक १५१ दिवस आढळला.
४) २०१-३०० निर्देशांक हा आरोग्यासाठी हानिकारक (Poor / Unhealthy) श्रेणीत येत असून ह्यामुळे सर्व नागरिकांना श्वसनाच्या हृदयाच्या, आरोग्याच्या समस्या उदभवू शकतात .लोकांनी बाहेर व्यायाम करणे टाळावे, धावणे टाळावे अश्या सुचना आहेत. चंद्रपूर मध्ये असे धोकादायक ३६ प्रदूषित दिवस आढळले.
५) ३०१-४०० निर्देशांक हा (very poor) धोकादायक श्रेणीत येत असून चंद्रपूर मध्ये हा प्रदूषण निर्देशांक ०५ दिवस आढळला.
६) ४०१-५०० निर्देशांक हा (Severe) घातक श्रेणीत येतो मात्र चंद्रपूर मध्ये ह्या श्रेणीतील प्रदूषण आढळले नाही.

प्रदूषणाचे स्त्रोत आणि आरोग्यावर परिणाम –
चंद्रपूर शहरात थर्मल पॉवर स्टेशन, वाहतूक आणि वाहनांचे प्रदूषण जास्त आहे. आजच्या आधुनिक जीवन शैलीमुळे घरात आणि बाहेर सर्वच ठिकाणी वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. जसे ओउद्द्योगिक प्रदूषण आहे तसेच नागरिकांचे सुधा प्रदूषण आहे, जसे वाहनांचा धूर आणि धूळ, वाहतूक, कचरा ज्वलन, लाकूड, कोळसा ज्वलन इ ओउद्‌द्योगिक क्षेत्रात कोळसा ज्वलन राख, दूषित वायू, वाहतूक, इ. जल, थल, ध्वनी आणि वायू प्रदूषणामुळे चंद्रपुरकर गेल्या १० वर्षापासून त्रस्त आहेत. २००५/०६ साली चंद्रपूर चा आरोग्य सर्वे झाला होता त्यात आरोग्याच्या समस्येची भयावहता दिसली, त्यानंतर अनेकदा मागणी करूनही शासनातर्फे आरोग्य सर्वे झाला नाही परंतु सरकारी आणि खाजगी रुग्णालये आज ज्या पद्धतीने रुग्णांनी भरलेले आहेत आणि खाजगी चिकित्सकांच्या म्हणण्या नुसार हवां प्रदूषणाचे रोगी दर वर्षी वाढत आहेत, त्यानुसार स्थिती भयावह आहे. वायू प्रदूषणामुळे श्वसनाचे विविध रोग, दमा, टीबी, कैंसर, सर्दी, खोकला, डोळे, त्वचा, आणि हृदय रोगांचे रुग्ण वाढत आहेत. आरोग्यासाठी येणारा खर्चसुद्धा मोठा आहे तेव्हा स्थानिक महापालिका, जिल्हापरिषद सदस्य आणि आमदार, खासदार असलेल्या लोकप्रतिनिधीनि प्रदूषण आणि आरोग्य हा विषय शासनाकाडे लावून धरला पाहिजे. नागरिक आणि मतदारांची काळजी घेणे हे सरकारचे घटनात्मक कर्तव्य आणि जिम्मेदारी आहे. स्थानिक आमदार किशोर जोरगेवर ह्यांनी विधान सभेत विचारलेल्या प्रश्नावर शासनाने प्रदूषण नाही, रोगराई नाही परंतु कृती आराखडा सुरु आसल्याचे उत्तर दिले. प्रशासनाने केवळ कृती आराखडे तयार करून उपयोग नाही तर जमिनीवर त्वरित प्रदूषणावर उपाय योजना केल्या पाहिजे. तरच चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यात शास्वत विकास होऊ शकतो.

Latest Posts

Don't Miss