Latest Posts

ब्राझिलमध्ये पर्यटकांना घेऊन जाणारे चार्टर्ड विमान कोसळले : वैमानिकासह १४ जणांचा मृत्यू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (Navi Delhi) : ब्राझिलमध्ये मध्यम आकाराचे चार्टर्ड विमान कोसळले आहे. अ‍ॅमेझॉन राज्यातील बार्लेसोल प्रांतामध्ये झालेल्या या दुर्घटनेमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये विमानाच्या वैमानिकाचा आणि एका क्रू मेंबरचाही समावेश आहे.

पर्यटकांना घेऊन हे विमान अ‍ॅमेझॉन राज्यातील बार्सेसोलच्या दिशेने निघाले होते. मात्र खराब हवामानामुळे विमान कोसळले. यात वैमानिकासह १४ जणांचा मृत्यू झाला. विमान अपघातातील सर्व मयत पर्यटक अमेरिकेतील असल्याची माहिती मिळतेय.

विमान कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक प्रसासन आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून विमानाच्या ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. विमान अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विमानाचा ब्लॅकबॉक्स मिळाल्यावर सर्व काही स्पष्ट होईल.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला. विमान कोसळले त्यावेळी मुसळधार पाऊस सुरू होता. खराब हवामान आणि कमी दृष्यमानता यामुळे हा अपघात झाला असावा अशी शक्यता आहे.

दरम्यान, या अपघाताबाबत राज्यपाल विल्सन लिमा यांनीही माहिती दिली. ॲमेझॉनची राजधानी मानौसपासून ४०० किलोमीटर अंतरावर विमान कोसळले. हे विमान मॅनॉस एरोटॅक्सी एअरलाइनचे होते. कंपनीनेही विमान अपघाताची पुष्टी केली असून एक निवेदन जारी केले आहे. विमान अपघाताची तपास सुरू आहे असे कंपनीने म्हटले आहे. मत्र जीवितहानी किंवा जखमींबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Latest Posts

Don't Miss