Latest Posts

एकलव्य मॉडेल स्कूलमध्ये प्रवेशास संधी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी अंतर्गत एकलव्य मॉडेल रेसिडेन्सीअल इंग्रजी माध्यमाच्या स्कूलमध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याकरिता २५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११.०० ते २:०० वाजेपर्यंत प्रवेशपूर्व परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

शैक्षणिक सत्र २०२४-२५ या वर्षाकरिता इयत्ता सहावी ते नववीच्या वर्गातील विद्यार्थी अनुशेष भरून काढण्यासाठी २५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत एकलव्य रेसिडेन्सी मॉडेल स्कूल, अहेरी येथे परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. इयत्ता सहावीच्या प्रवेशा करिता १०० गुणांचा पेपर व सातवी ते नववी पर्यंतच्या प्रवेशाकरिता २०० गुणांचा पेपर घेण्यात येणार आहे.

त्याकरिता इच्छुक व पात्र अनुसूचित जमाती/आदीम जमातीच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न सहा लक्ष पेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांनी/पालकांनी परीक्षा आवेदन पत्र व सविस्तर माहिती करिता प्रकल्प कार्यालय, अहेरी येथे संपर्क करून ३० जानेवारी २०२४ पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावे, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे यांनी केलेले आहे.

Latest Posts

Don't Miss