Latest Posts

फेब्रुवारीमध्ये एवढ्या दिवस राहणार बँका बंद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (Navi Delhi) : वर्षाचा पहिला महिन्यात आता संपायला आला आहे. तीन दिवसांनंतर नवीन महिना म्हणजेच फेब्रुवारीची सुरुवात होणार आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये बँकांमध्ये भरपूर सुट्ट्या असणार आहेत.
या महिन्याच्या 29 मधील 11 दिवस बँकांमध्ये कामकाज चालणार नाही. शनिवार आणि रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्यांसोबत अनेक सण आणि काही महत्त्वपूर्ण दिवसांमुळे बँकांमध्ये कामकाज होणार नाही. अशा वेळी तुम्हीही पुढील महिन्यात एखादे महत्वाचे काम पूर्ण करण्याचा विचार करत असाल तर आधी सुट्ट्यांची यादी अवश्य चेक करा.

रिझर्व्ह बँक प्रत्येक कॅलेंडर वर्षात बँकांच्या सुट्ट्यांची लिस्ट जारी करते. फेब्रुवारीमध्ये किती सुट्ट्या असणार याची यादी पाहूया. तर देशातील बँका फेब्रुवारीतील 29 पैकी 11 दिवस बंद राहणार आहेत. आरबीआयद्वारे जारी हॉलिडे लिस्टमध्ये अनेक सुट्या या राष्ट्रीय स्तराच्या आहेत. त्या दिवशी संपूर्ण देशात बँकींग सेवा बंद राहतील. तर काही सुट्ट्या या स्थानिक किंवा क्षेत्रीय स्तराच्या आहेत. त्या दिवशी त्यासंबंधित राज्यांमध्येच बँकेच्या शाखा बंद असतात.

चालू राहतील ऑनलाइन सेवा –
बँकांमध्ये सुट्टी असल्यामुळे अनेकदा आवश्यक काम अटकतात. मात्र आता बँकांद्वारे जास्तीत जास्त सेवा या ऑनलाइन करण्यात आल्यामुळे जास्त अडचण येत नाही. विशेष म्हणजे सुट्टीच्या दिवशी बँकांची ऑनलाइन सर्व्हिस चालू राहते. यामुळे तुम्ही नेटबँकिंग, मोबाईल बँकिंग किंवा यूपीआयच्या माध्यमातून एका बँक अकाउंटमधून दुसऱ्या बँक अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करु शकतात. तसंच इतर कामही ऑनलाइन करु शकता.

सुट्ट्यांची लिस्ट –
4 फेब्रुवारी 2024- रविवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.
10 फेब्रुवारी 2024- महिन्याच्या दुसऱ्या शनिवारमुळे देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
11 फेब्रुवारी 2024- रविवारमुळे संपूर्ण देशात बँका बंद राहणार आहेत.
14 फेब्रुवारी 2024- बसंत पंचमी आणि सरस्वती पूजेमुळे आगरतळा, भुवनेश्वर, कोलकाता येथे बँकांना सुट्टी राहील.
15 फेब्रुवारी 2024- लुई न्गाई नीमुळे इंफाळमध्ये बँका बंद राहतील.
18 फेब्रुवारी 2024- रविवारमुळे देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
19 फेब्रुवारी 2024- छत्रपती शिवाजी जयंतीनिमित्य महाराष्ट्रामध्ये बँका बंद राहतील.
20 फेब्रुवारी 2024- राज्य दिनानिमित्य आयझॉल आणि इटानगरमध्ये बँकांना सुट्टी राहील.
24 फेब्रुवारी 2024- दुसऱ्या शनिवारमुळे देशभरातील बँकांना बंद असतील.
25 फेब्रुवारी 2024- रविवारमुळे देशभरातील बँका बंद राहतील.
26 फेब्रुवारी 2024- नायकुममुळे इटानगरमधील बँकांना सुट्टी असेल.

Latest Posts

Don't Miss