Latest Posts

गुजरातमध्ये गेम झोनला भीषण आग : १२ मुलांसह २६ जणांचा होरपळून मृत्यू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / गुजरात (Gujarat) : गुजरातच्या राजकोटमधील गेम झोनमध्ये शनिवारी दुपारी भीषण आग लागली. अवघ्या काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण केले. या भयंकर आगीत १२ लहान मुलांसह २६ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

मृतदेह इतक्या गंभीररीत्या जळाले आहेत की ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी केली जाणार आहे.

राजकोट शहरातील कावद रोडवर टीआरपी मॉलमधील हे गेम झोन आहे. आगीने गेम झोन अक्षरशः गिळून टाकले. आगीचे लोट आकाशात सर्वदूर पसरले होते. तेथे बघ्यांची एकच गर्दी झाली होती. अग्निशमन दल व बचाव पथकाने रात्री उशिरा आगीवर नियंत्रण मिळवले. बचावकार्य वेगाने सुरू होते. गेम झोनमध्ये किती जण होते याची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नाही. २५ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे.

Latest Posts

Don't Miss