Latest Posts

महाराष्ट्रात रोज सात शेतकऱ्यांची आत्महत्या : ४ महिन्यांत ८३८ मृत्यू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई (Nagpur) : अवकाळीचा फटका, नापिकी, कर्जाचा बोजा आणि वसुलीसाठी बँका व सावकारांचा दबाव यामुळे शेतकरी पिचला आहे. निराश शेतकऱ्यांचे आत्महत्यासत्र सुरू आहे.

गेल्या ४८ तासांत विदर्भात पाच शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले असून गेल्या चार महिन्यांत राज्यात ८०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दररोज सरासरी ७ शेतकरी आत्महत्या करत आहेत. यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

विदर्भात गेल्या तासांत यवतमाळमध्ये २, चंद्रपूरमध्ये २ आणि भंडाऱ्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. यवतमाळ जिह्यातील गांधीनगर येथील बन्सी पवार आणि गगनमाळ येथील दादाराव बोबडे या शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. चंद्रपूर जिह्यातील चोरटी येथील भोजराज राऊत आणि रणमोजन गावात नीलकंठ प्रधान तर भंडारा जिह्यातील दाभेविरली येथील विनोद ढोरे या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.

पूर्व आणि पश्चिम विदर्भातील परिस्थिती तर भीषण आहे. विदर्भात ३० जूनपर्यंत केवळ  ४५ टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. तेथील कापूस आणि सोयाबिनला भाव नाही. त्यानंतरही सरकारने तिथे दुष्काळ जाहीर केलेला नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांना आत्मघाती पावले उचलावी लागत असल्याचा आरोप होत आहे.

या ८३८ आत्महत्यांपैकी केवळ १७१ प्रकरणे वैध ठरवण्यात आली. त्यातही केवळ १०४ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनाच सरकारकडून एक लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली. ६२ प्रकरणे फेटाळण्यात आली आहेत. इतर ६०५ प्रकरणांच्या अद्याप कागदपत्रांची पडताळणीच सुरू आहे.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, १९९५ ते २० १४ दरम्यान २ लाख ९६ हजार ४३८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. डेटा दर्शविते की, १९९५ ते २०१४  दरम्यान २९६, ४३८ शेतकरी आत्महत्या करून मरण पावले.

२०१४ ते २०२२ या नऊ वर्षांमध्ये, ही संख्या १००, ४७४ इतकी होती. २०२२ मध्ये, भारतामध्ये शेती क्षेत्रात गुंतलेल्या एकूण ११, २९० व्यक्तींनी आत्महत्या केल्या आहेत, जे देशातील एकूण आत्महत्याग्रस्तांपैकी ६.६ टक्के आहेत.

यापूर्वी, सरकारांनी वेगवेगळे आकडे नोंदवले होते, २०१४ मध्ये ५ हजार ६५० शेतकरी आत्महत्या ते २००४ मधील सर्वाधिक  १८ हजार २४१ शेतकरी आत्महत्यांपर्यंत. २००५ ते  १० वर्षांच्या कालावधीत भारतातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण प्रति १ लाख लोकसंख्येमागे १.४ आणि १.८ च्या दरम्यान होते. तथापि, २०१७ आणि २०१८ मधील आकडेवारीनुसार दररोज सरासरी १० आत्महत्या किंवा प्रतिवर्षी ५ हजार ७६० आत्महत्या दिसून आल्या. शेतकरी आत्महत्यांच्या आकडेवारीत राज्ये फेरफार करत असल्याचा आरोप आहे.

२०२४ मध्ये झालेल्या आत्महत्या –
जानेवारी – २३५, फेब्रुवारी – २०८, मार्च – २१५, एप्रिल – १८०.

Latest Posts

Don't Miss